Karnataka Election : पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले, काँग्रेस विकासामधील अडथळा

काँग्रेस हा पक्ष जुने इंजिन आहे, जे नेहमीच विकासात अडथळा आणते. काँग्रेस पक्षाने काहीही केले तरी कर्नाटकची जनता खोट्या आश्वासनांच्या जाळ्यात अडकणार नाही.

207
मतदानाच्या आदल्या दिवशी पंतप्रधानांचे जनतेला पत्र 
मतदानाच्या आदल्या दिवशी पंतप्रधानांचे जनतेला पत्र 

कर्नाटक दौऱ्याच्या दुसऱ्या दिवशी सुद्धा पंतप्रधान नरेंद्र मोदींनी पुन्हा काँग्रेस आणि जेडीएसवर हल्लाबोल केला. कर्नाटक विधानसभा निवडणुकीच्या Karnataka Election पार्श्वभूमीवर एका निवडणूक रॅलीला संबोधित करताना पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले की, जेडीएस आणि काँग्रेस हे कर्नाटकच्या विकासातील सर्वात मोठे अडथळे आहेत. ते टीम म्हणून लढले तरी कर्नाटकमधील जनता त्यांना सत्तेवर येण्याची संधी देणार नाही.

काँग्रेस हा पक्ष जुने इंजिन

कर्नाटकची ही निवडणूक Karnataka Election केवळ आमदार, मंत्री किंवा येत्या पाच वर्षांसाठी मुख्यमंत्री बनवण्याची निवडणूक नाही. येत्या 25 वर्षात विकसित भारताच्या रोडमॅपचा पाया मजबूत करण्यासाठी ही निवडणूक आहे. कर्नाटकातील जनतेला राज्याच्या विकासासाठी डबल इंजिनचे सरकार निवडून द्यावे लागेल, असे नरेंद्र मोदी म्हणाले. याशिवाय, काँग्रेसवर हल्लाबोल करताना नरेंद्र मोदी म्हणाले की, काँग्रेस हा पक्ष जुने इंजिन आहे, जे नेहमीच विकासात अडथळा आणते. काँग्रेस पक्षाने काहीही केले तरी कर्नाटकची जनता खोट्या आश्वासनांच्या जाळ्यात अडकणार नाही. याचबरोबर नरेंद्र मोदी म्हणाले की, काँग्रेस सरकारने कधीही शेतकऱ्यांची काळजी घेतली नाही, परंतु भाजप सरकार शेतकऱ्यांसाठी बियाण्यांपासून बाजारपेठेपर्यंत काम करत आहे. केंद्र सरकारने पीएम किसान सन्मान निधीला पाठवलेल्या पैशात येथील भाजप सरकारने आणखी 4 हजार रुपयांची भर घातली आहे. त्यामुळे कर्नाटकातील लाखो शेतकरी कुटुंबांच्या बँक खात्यात 18 हजार कोटी रुपये पोहोचले आहेत, असेही पंतप्रधान मोदी म्हणाले.

(हेही वाचा Brij Bhushan Singh : यांच्याविरुद्ध सुरु असलेल्या आंदोलनावरून ‘फोगाट’ भावंडांमध्ये वाद)

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.