प्रवर्तन निदेशालय (ED) ने मैसूरच्या एका मोठ्या जमीन घोटाळ्यात १०० कोटींच्या ९२ मालमत्ता जप्त केल्या आहेत. आतापर्यंत या प्रकरणात ED ने एकूण ४०० कोटींची मालमत्ता ताब्यात घेतली आहे. या मालमत्ता गृहनिर्माण संस्था आणि काही व्यक्तींच्या नावावर होत्या, ज्या मोठ्या अधिकाऱ्यांसाठी ‘बेनामी’ मालक होत्या, असा आरोप आहे.
ED, Bangalore has provisionally attached 92 immovable properties (MUDA sites) having market value of Rs. 100 Crore (approx.) on 9/06/2025 under the provisions of the PMLA, 2002, in connection with MUDA Scam case matter related to Siddaramaiah and others having cumulative…
— ED (@dir_ed) June 10, 2025
या घोटाळ्याच्या मुळाशी कर्नाटकचे (Karnataka) मुख्यमंत्री सिद्धरामय्या (CM Siddharamaih) यांचे नाव देखील समोर आले आहे. ED च्या तपासानुसार, MUDA (म्हैसूर शहरी विकास प्राधिकरण, Mysore Urban Development Authority) अधिकाऱ्यांनी नियमांचे उल्लंघन करून आणि फसवणूक करून जमिनींचे वाटप केले. अनेक वेळा तर कागदपत्रांच्या तारखाही बदलण्यात आल्या जेणेकरून बेकायदेशीर काम कायदेशीर वाटावे.
अधिकाऱ्यांना रोख रक्कम आणि बँक खात्यांद्वारे लाच मिळाली, ज्यात त्यांच्या कुटुंबातील सदस्यही सामील होते. ED ने ९ जून 2025 रोजी या नवीन मालमत्ता जप्त केल्या आहेत.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community