K D Singh ED : टीएमसीच्या माजी खासदारावर ईडीची मोठी कारवाई; ३ राज्यांतील मालमत्ता जप्त

चिटफंड समूहाने अल्केमिस्ट होल्डिंग्स लिमिटेड आणि अल्केमिस्ट टाउनशिप इंडिया लिमिटेड सारख्या कंपन्यांच्या माध्यमातून सामान्य लोकांकडून १८०० कोटी रुपये जमा केल्याचा आरोप आहे. गुंतवणूकदारांना त्यांच्या गुंतवणुकीवर प्रचंड परतावा देण्याबरोबरच सदनिका आणि भूखंडांची खोटी आश्वासने देण्यात आल्याचा आरोप देखील के डी सिंह यांच्यावर आहे.

275
K D Singh ED : टीएमसीच्या माजी खासदारावर ईडीची मोठी कारवाई; ३ राज्यांतील मालमत्ता जप्त

पश्चिम बंगालमधील सत्ताधारी तृणमूल काँग्रेसचे माजी खासदार के. डी. सिंह (K D Singh ED) यांची चिटफंड कंपनी असलेल्या अल्केमिस्ट ग्रुपविरोधात ईडीने मनी लाँड्रिंग प्रतिबंधक कायद्यांतर्गत (पीएमएलए) कारवाई केली आहे.

(हेही वाचा – Sanjeev Balyan : भाजपा उमेदवार संजीव बल्यान यांच्या ताफ्यावर हल्ला; वाहनांची तोडफोड)

या कारवाईमध्ये ईडीने हिमाचल प्रदेश, हरियाणा आणि मध्य प्रदेशात २९ कोटी रुपयांहून अधिक किमतीचे विमान आणि मालमत्ता आणि सदनिका देखील जप्त केल्या आहेत. शनिवार ३० मार्च रोजी ईडीकडून ही माहिती जाहीर करण्यात आली आहे. (K D Singh ED)

ईडीने निवेदनात नमूद केल्यानुसार;

के डी सिंह (K D Singh ED) यांच्यावरील हा तपास सीबीआय आणि उत्तर प्रदेश पोलीस तसेच पश्चिम बंगाल पोलिसांनी नोंदवलेल्या अनेक एफआयआरशी संबंधित आहे. चिटफंड समूहाने अल्केमिस्ट होल्डिंग्स लिमिटेड आणि अल्केमिस्ट टाउनशिप इंडिया लिमिटेड सारख्या कंपन्यांच्या माध्यमातून सामान्य लोकांकडून १८०० कोटी रुपये जमा केल्याचा आरोप आहे. गुंतवणूकदारांना त्यांच्या गुंतवणुकीवर प्रचंड परतावा देण्याबरोबरच सदनिका आणि भूखंडांची खोटी आश्वासने देण्यात आल्याचा आरोप देखील के डी सिंह यांच्यावर आहे. पीएमएलए अंतर्गत मालमत्ता जप्त करण्यात आली असून त्यात विमानाचा समावेश आहे, असे ईडीने एका निवेदनात म्हटले आहे. (K D Singh ED)

(हेही वाचा – PM Narendra Modi मेरठ मधून करणार लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराला सुरुवात)

कोण आहेत के. डी. सिंह ?

के. डी. सिंह (K D Singh ED) यांचे पूर्ण नाव कंवरदीप सिंह आहे, जे राज्यसभेचे पक्षाचे माजी खासदार आहेत. ईडीने यापूर्वी के. डी. सिंह यांच्या निवासस्थानी छापे टाकले होते आणि अनेक महत्त्वाची कागदपत्रे, परदेशी चलन आणि रोख रक्कम जप्त केली होती. के. डी. सिंह यांच्याविरुद्ध पीएमएलए अंतर्गत २०१८ मध्ये खटला सुरू करण्यात आला होता. अल्केमिस्ट इन्फ्रा रियल्टी लिमिटेडवर ईडीने २०१६ मध्ये गुन्हा दाखल केला होता. यापूर्वी के. डी. सिंह यांची रिसॉर्ट, शोरूम आणि बँक खात्यांसह सुमारे २३९ कोटी रुपयांची मालमत्ता जप्त करण्यात आली होती. (K D Singh ED)

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.