-
खास प्रतिनिधी
राष्ट्रवादी काँग्रेसचे (शरद पवार) मुंब्रा मतदारसंघाचे आमदार जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) ‘हिंदी सक्ती’च्या वादात उडी घेत, आपलेच तोंड पोळून घेतले. आव्हाड यांनी हिंदी भाषेवर एक निबंध लिहीत ‘नरो वा कुंजरो वा’ भूमिका घेत प्रसिद्धी मिळवण्याचा केविलवाणा प्रयत्न केला खरा पण तो त्यांच्याच अंगलट आला. नेटकऱ्यांनी त्यांना त्यांची जागा दाखवून दिली.
काय म्हणाले जितेंद्र आव्हाड?
आव्हाड (Jitendra Awhad) यांनी ‘X’ या समाजमाध्यमावर एक पोस्ट केली. ती अशी :
“हिंदी-जबरदस्ती कश्या साठी? हिंदी भाषा दिन २०२३*: दरवर्षी १४ सप्टेंबर हा दिवस हिंदी भाषा दिन म्हणून उत्साहात साजरा करण्यात येत असतो. जगभरात ज्या भाषांमध्ये जास्त प्रमाणात संवाद साधला जातो; त्यामध्ये हिंदी भाषेचाही समावेश होत असतो. मात्र, हिंदी भाषेच्या बाबतीत लोकांमध्ये असाही एक गैरसमज आहे की, हिंदी भाषेचा वापर भारतामध्ये अधिक प्रमाणात होत असल्याने हिंदी ही राष्ट्रभाषा आहे. मात्र, वास्तवात तसे नाही. अधिकृतपणे हिंदीला राष्ट्र भाषेचा दर्जा देण्यात आलेला नाही. त्यामागील कारणांचा घेतलेला हा धांडोळा…..
*हिंदी-जबरदस्ती कश्या साठी?
*हिंदी भाषा दिन २०२३* : दरवर्षी १४ सप्टेंबर हा दिवस हिंदी भाषा दिन म्हणून उत्साहात साजरा करण्यात येत असतो. जगभरात ज्या भाषांमध्ये जास्त प्रमाणात संवाद साधला जातो; त्यामध्ये हिंदी भाषेचाही समावेश होत असतो. मात्र, हिंदी भाषेच्या बाबतीत लोकांमध्ये…
— Dr.Jitendra Awhad (@Awhadspeaks) April 18, 2025
हिंदी भाषेबाबत केलेला कायदा
भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर कन्हैयालाल माणिकलाल मुन्शी आणि नरसिम्हा गोपालस्वामी अय्यंगार यांच्यावर भाषेसंबंधी कायदे बनविण्याची जबाबदारी सोपविण्यात आली होती. डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या अध्यक्षतेखालील या समितीमध्ये हिंदी भाषेवर प्रचंड खल झाला. अखेरीस १४ सप्टेंबर १९४९ रोजी कायदा करण्यात आला. संविधानातील कलम ३४३ आणि ३५१ नुसार हिंदी भाषेला राज्य भाषेचा दर्जा देण्यात आला, राष्ट्र भाषेचा नाही! पण, तेव्हापासूनच १४ सप्टेंबर हा दिवस ‘हिंदी भाषा दिन’ म्हणून साजरा करण्यात येऊ लागला. संविधान निर्मात्यांनी त्यावेळेस असेही नमूद केले होते की, हिंदी भाषेचा प्रचार – प्रसार सरकारने करावाच, शिवाय, हिंदीचा शब्दकोषही विस्तारण्यासाठी कार्य करावे. परंतु, हिंदी भाषेच्या बाबतीत सरकारने संविधानकर्त्यांच्या सूचनेप्रमाणे धोरण राबविले नाही.
संविधानाच्या कलम ३४३ मध्ये असे नमूद करण्यात आले आहे की, हिंदी ही राज्य भाषा असेल आणि तिची लिपी ही देवनागरी असेल. हिंदीचा सरकारी कामातील वापर हा १५ वर्षांसाठी करण्यात आला. मात्र, पंधरा वर्षानंतरही सरकारी कामकाज अधिकतर इंग्रजी भाषेतच होत आहे. कालांतराने संविधानात सुधारणा (दुरूस्ती) करून भारतातील अन्य भाषांनाही मान्यता देण्यात आली. सद्यस्थितीत देशात सर्वाधिक बोलली जाणारी ही हिंदी भाषा असून आजमितीला एकूण लोकसंख्येपैकी ४३ टक्क्यांपेक्षा अधिक नागरिक हिंदी भाषेत संवाद साधतात.”
(हेही वाचा – ठाकरे बंधू एकत्र येण्याचे संकेत; राज यांच्या भूमिकेला Uddhav Thackeray यांचा सकारात्मक प्रतिसाद)
ठोस भूमिका घेणे अडचणीचे
जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) यांनी वरील पोस्ट केलेल्या निबंधात हिंदीला पाठिंबा दिला की विरोध केला हे गुलदस्त्यात ठेवण्यात आले आहे. पाठिंबा दिला तर भाजपाला किंवा मोदी सरकारला समर्थन दिल्याचा संदेश जाईल आणि विरोध केला तर त्यांच्या मतदारसंघातील बहुतांश मतदारांचा रोष ओढवला जाईल, अशी भीती त्यांना वाटत असावी, अशी चर्चा राजकीय वर्तुळात होत आहे.
काय म्हणाले नेटकरी?
अनेक नेटकऱ्यांनी जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) यांना अडचणीत आणले. त्यांनी थेट प्रश्न करत प्रचंड ट्रोल केले. “साहेब मुंब्रात मराठीमध्ये भाषण करून दाखवा,”, “मुंब्य्रामध्ये मराठीत बोलतात की हिंदीत?”, “हेच जर उर्दू भाषा सक्ती असती तर हा पाठिंबा देणारा पहिला असता… खरं का?” असे अनेक प्रश्न करत नेटकऱ्यांनी आव्हाडांना हैराण केले. आय
इतर प्रतिक्रिया त्यांच्याच शब्दांत पुढीलप्रमाणे :
- सर हे तुम्ही बोलत आहेत
एका मराठी मुलाला मराठी बोलला म्हणून तुमच्या शांतताप्रिय मतदार संघात माफी मागावी लागली आणि तुम्ही तेव्हा टोपीवाल्याना एका शब्दाने पण काही बोलले नाह - साहेब तुमचा सर्व हिंदी विरोध कळला.. पण खर सांगतोय ह्या ट्विट मध्ये कुठही मराठी प्रेम दिसले नाही.. तुमचा समर्थक असूनही जे आहे ते आहे
- Pahile mumbra mde marathi bolyla lava tithe 80% lok Hindi boltat .. suruvat adhi swatachya matdarsanghatun kara ..
- मौलाना जितुद्दीन यांच्या मुंब्र्यात सुद्धा एक ह्यांनी बनवलेला संविधान चालतो तिथे मराठी भाषेला जागा नाही .. ओन्ली उरुडू
- जित्या ,मुंब्रामध्ये कोणती भाषा वापरतात रे ?
- तुमचा मुंब्र्यात ८०% लोक हिंदी उर्दू वापरतात
- ह्यांना फक्त ऊर्दू भाषा दिन अवडतो!
- इथुन पुढे तुम्ही फक्त मराठीतच बाईट द्या शिवाय मुंब्र्यात तुम्ही स्वतः मराठी कमी हिंदी भाषा जास्त बोलताना दिसतात प्रत्येक वेळी ते आधी बंद करा इथुन पुढे हिंदी भाषेला विरोध म्हणुन तुम्ही फक्त मराठीतच बोलणार का स्पष्ट सांगा
- साहेब, तुमच्या एक्स खात्याचा संभाळ्या बदला! तो व्हॉट्सॲपवर आलेल्या संदेशातील चांदण्या काढायचा कंटाळा करत आहे.
- आव्हाड, रिकाम्या फुशारक्या मारण्यापेक्षा तुमचा हिंदी भाषा सक्तीकरणाला विरोध आहे की पाठिंबा.. ह्या प्रश्नाचं उत्तर द्या..
- तुम्हाला फक्त श्वानागत भुंकण्या व्यतिरिक्त इतर कामधंदा नाही असेच शंभर टक्के खात्री आहे.भाजपाच्या व हिंदूंच्या विरोधात जे जे फंडे निर्माण करता येतील ते ते फंडे अवलंबवा. प्रत्येकवेळी तोंड घाशी पडुन सुध्दा तुम्ही लो सुधरले तर काय म्हणायचे.खरे तर हिंदूचे शत्रु तुम्हीच लोक आहात.
- महोदय, रोजच्या वापरात हिंदी शब्द वाढू लागले आहेत, तेही मराठी शब्द असताना. अगदी टीव्हीवाल्यांकडून सुद्धा! (कंसात मूळ मराठी शब्द)
उदा. भांडाफोड, पोलखोल, दूध का दूध …, जेवण बनवणे (स्वयंपाक करणे), संविधान (घटना), आरक्षण (राखीव जागा) - आव्हाड तु आणी तुझे गाझापट्टीचे कार्यकर्ते मुब्र्यात कोणती भाषा बोलतो मतं मागण्या साठी?? मराठी की उरडू की हिंदी ???ते क्लीअर कर मग ज्ञान पाज
हेही पहा –
Join Our WhatsApp Community