
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या 26 व्या वर्धापन दिनानिमित्त पुण्यात पार पडलेल्या मुख्य कार्यक्रमात आज अनेक घडामोडींनी पक्षाच्या अंतर्गत घुसमटीचे चित्र अधोरेखित केले. प्रमुख नेते शरद पवार यांच्यापासून ते प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील (Jayant Patil) आणि माजी मंत्री प्राजक्त तनपुरे या मामा-भाच्यांच्या हालचालींनी सध्या महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळात तर्कवितर्कांना उधाण आलं आहे. (Jayant Patil)
शरद पवारांची देहबोली आणि व्यथित सूर…
शरद पवारांनी आपल्या भाषणात स्पष्ट शब्दांत पक्षात झालेल्या फुटीबद्दल खंत व्यक्त केली. “पक्षात फूट पडेल असं वाटलं नव्हतं… काही लोक दुसऱ्या विचारसरणीने गेले, ही फूट आता वाढली आहे,” असं म्हणत त्यांनी आगामी निवडणुकीत वेगळं चित्र समोर येईल, असा इशाराही दिला. त्यांचा चेहरा आणि देहबोली मात्र अतिशय निराशाजनक होती, ज्यातून त्यांच्या मनातली खळबळ दिसून आली. (Jayant Patil)
जयंत पाटीलंचे राजीनाम्याचे संकेत
कार्यक्रमात राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील (Jayant Patil) यांनी आपल्या भाषणात थेट राजीनामा देण्याचे सूतोवाच करत उपस्थित कार्यकर्त्यांना भावुक केलं. “सात वर्षे जबाबदारी सांभाळली, आता नवीन चेहऱ्यांना संधी मिळायला हवी,” असं म्हणत त्यांनी आपले पवारसाहेबांप्रती कृतज्ञता व्यक्त केली. त्यांच्या या भाषणामुळे अनेकांच्या मनात प्रश्न उभे राहिले की, जयंत पाटील पुढे कुठे जाणार? (Jayant Patil)
भाच्याची गूढ अनुपस्थिती – प्राजक्त तनपुरेंनी कार्यक्रमाला दांडी का मारली?
या कार्यक्रमात जयंत पाटलांचे (Jayant Patil) भाचे आणि राहुरीचे माजी आमदार प्राजक्त तनपुरे अनुपस्थित होते. विशेष म्हणजे ते पुण्याला अगदी जवळ असलेल्या राहुरीतच होते. त्यांनी केवळ १५० किमी अंतर असलेला वर्धापन दिन सोहळा टाळल्याने त्यांची भूमिका संशयाच्या भोवऱ्यात सापडली आहे. त्यांच्या भाजप प्रवेशाच्या चर्चा पुन्हा एकदा जोर धरू लागल्या आहेत.
भाजपमध्ये प्रवेश? – संकेत अनेक!
प्राजक्त तनपुरेंच्या राहुरी साखर कारखान्याच्या निवडणुकीत भाजपमधील विखे गटाकडून मिळालेली कथित ‘आंतरिक मदत’ आणि कारखान्याच्या विजयानंतर त्यांच्या काकांनी ‘आठ दिवसांत गोड बातमी’ देण्याचा दिलेला इशारा – या सगळ्या गोष्टी भाजप प्रवेशाचीच तयारी असल्याचे सूचित करत आहेत. (Jayant Patil)
जयंत पाटील आणि रोहित पवारांतील मतभेद?
सूत्रांच्या माहितीनुसार, जयंत पाटील आणि आ. रोहित पवार यांच्यातील मतभेदही गेल्या काही काळात वाढले आहेत. जयंत पाटील भाजपकडे झुकत असल्याची चर्चा होती, मात्र पवार कुटुंबीयांमध्ये सलोखा झाल्यास त्यांचा प्रवेश रखडण्याची शक्यता वर्तवली जात आहे. आता अजित पवार गटाशी जवळीक साधण्याचा किंवा थेट भाजप प्रवेशाचा मार्ग जयंत पाटील स्वीकारणार का, हे पाहणं औत्सुक्याचं ठरत आहे. (Jayant Patil)
शरद पवारांची खंत, जयंत पाटील यांचे राजीनाम्याचे सूतोवाच, आणि प्राजक्त तनपुरेंची गूढ अनुपस्थिती — या सगळ्यांचा संगम पाहता राष्ट्रवादी काँग्रेसच्या अंतर्गत मोठा भूकंप लवकरच होणार, हे स्पष्ट आहे. मामा-भाचे कोणत्या दिशेने वळणार? भाजपमध्ये प्रवेश करणार की अजित पवार गटात विलीन होणार? हे प्रश्न आगामी दिवसांत महाराष्ट्राच्या राजकारणात धुरळा उडवणारे ठरणार आहेत. (Jayant Patil)
हेही पहा-
Join Our WhatsApp Community