Jammu and Kashmir : SIA ची काश्मीरमध्ये अनेक ठिकाणी छापेमारी ; दहशतवादी हालचालींबद्दल मिळाली माहिती

Jammu and Kashmir : SIA ची काश्मीरमध्ये अनेक ठिकाणी छापेमारी ; दहशतवादी हालचालींबद्दल मिळाली माहिती

63
Jammu and Kashmir : SIA ची काश्मीरमध्ये अनेक ठिकाणी छापेमारी ; दहशतवादी हालचालींबद्दल मिळाली माहिती
Jammu and Kashmir : SIA ची काश्मीरमध्ये अनेक ठिकाणी छापेमारी ; दहशतवादी हालचालींबद्दल मिळाली माहिती

जम्मू आणि काश्मीर (Jammu and Kashmir) पोलिसांची राज्य तपास संस्था (SIA) मध्य आणि उत्तर काश्मीरमधील सोपोर, बारामुल्ला, हंदवाडा, गंदरबल आणि श्रीनगरसह अनेक भागात छापे टाकत आहे. दहशतवादाशी संबंधित प्रकरणांच्या चौकशीच्या संदर्भात ही कारवाई केली जात आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, शुक्रवारी रात्री उशिरा एजन्सीला संशयित दहशतवादी हालचालींबद्दल माहिती मिळाली होती, त्यानंतर ही कारवाई सुरू करण्यात आली. (Jammu and Kashmir)

हेही वाचा-‘Operation Sindoor’वर भारताची भूमिका मांडण्यासाठी भारतीय खासदारांचे गट ५ देशांना भेट देणार !

पाकिस्तानचे पंतप्रधान शाहबाज शरीफ यांनी भारताने नूर खान एअरबेसवर हल्ला केल्याचे मान्य केले आहे. शुक्रवारी रात्री उशिरा त्यांनी सांगितले की, १० मे रोजी पहाटे २:३० वाजता जनरल असीम मुनीर यांनी त्यांना फोन करून भारतीय बॅलिस्टिक क्षेपणास्त्रांनी नूर खान एअरबेस आणि इतर काही भागात हल्ला केल्याची माहिती दिली. (Jammu and Kashmir)

चिनाब नदीचे पाणी रोखण्यासाठी रणबीर कालवा १२० किमीपर्यंत वाढवणार
पहलगाम हल्ल्यानंतर भारताने भारत-पाक पाणी करार (सिंधू पाणी करार) थांबवला आहे. आता भारत सरकार चिनाब नदीच्या पाण्याचा पूर्ण वापर करण्याची तयारी करत आहे. रणबीर कालव्याचा विस्तार १२० किलोमीटरपर्यंत करण्याची सरकारची योजना आहे. यामुळे शेतांना जास्त पाणी मिळेल आणि वीजही निर्माण होईल. याशिवाय, कठुआ, रावी आणि परगल कालव्यांची स्वच्छता देखील सुरू झाली आहे. आतापर्यंत भारत या पाण्याचा थोडासाच वापर करत होता, पण आता त्याचा फायदा जास्त घेतला जाईल. (Jammu and Kashmir )

हेही पहा-

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.