भारत व पाकिस्तान यांच्यात युध्दजन्य परिस्थिती निर्माण झाली असताना जम्मू व काश्मीरचे माजी मुख्यमंत्री फारुख अब्दुल्लाह(Farooq Abdullah) यांनी मोठं विधान केले आहे. पाकिस्तानी नागरिकांना बाहेर काढण्याचे सरकारचे हे कृत्य चांगले नाही, हे मानवतेच्या विरोधात असे महत्त्वाचे विधान फारुख अब्दुल्लाह(Farooq Abdullah) यांनी केले आहे. काही लोक गेल्या ७० वर्षांपासून, २५ वर्षांपासून इथे राहत आहेत त्यांची मुले इथे आहेत. त्यांनी कधीही भारताला दुखावले नाही, उलट त्यांनी स्वतःला भारतासमोर समर्पित केले आहे, असेही फारुख अब्दुल्लाह(Farooq Abdullah) यावेळी म्हणाले.
India-Pakistan Border : BSF ने उधळून लावला दहशतवादी कट ; सीमेवरून हातबॉम्ब, काडतुसे, ३ पिस्तूल जप्त
दरम्यान, जम्मू व काश्मीर नॅशनल कॉन्फरन्सचे अध्यक्ष फारुख अब्दुल्लाह(Farooq Abdullah) यांनी पहलगाम दहशतावादी हल्ल्यानंतर सुरक्षाव्यवस्थेत चूक झाल्याचे सांगितले. तसेच, हल्ल्यानंतर केंद्र सरकारने घेतलेल्या भूमिकेचंही त्यांनी स्वागत केलं होतं. ते म्हणाले, सुरक्षा आणि गुप्तचर यंत्रणेतील त्रुटींची बाब होती यात कुठलीच शंका नाही. आपण आपले जीवन चांगल्या प्रकारे जगत आहोत हे त्यांना (पाकिस्तानला) आवडले नसेल. म्हणून त्यांनी (पाकिस्तानने) हा दहशतवादी हल्ला केला, असेही अब्दुल्लाह(Farooq Abdullah) यांनी सांगितले.
तसेच, गेल्या १० वर्षांपासून एक कथा सुरू असून मुस्लिमांना पूर्णपणे संपवण्यासाठी, आपल्या मशिदी जाळण्यासाठी आपण आधीच त्याचा सामना करत होतो. आता, पाकिस्तानचे लष्करप्रमुख जनरल असीम मुनीर यांनी द्विराष्ट्रीय सिद्धांताबद्दल बोलून चिथावणी दिली असे सांगतानाच अब्दुल्लाह म्हणाले की, जर युद्ध झाले तर ते टेबलावर येईल, पण टेबलावर काय होईल, हे फक्त अल्लाहलाच माहिती आहे, असेही फारुख अब्दुल्लाह(Farooq Abdullah) यांनी सांगितले.(Farooq Abdullah)
Join Our WhatsApp Community