Israel-Iran War : इराणवरील हल्ल्यानंतर इस्रायलचे पंतप्रधान नेतान्याहू यांनी पंतप्रधान मोदींना केला फोन !

Israel-Iran War : इराणवरील हल्ल्यानंतर इस्रायलचे पंतप्रधान नेतान्याहू यांनी पंतप्रधान मोदींना केला फोन !

143
Israel-Iran War : इराणवरील हल्ल्यानंतर इस्रायलचे पंतप्रधान नेतान्याहू यांनी पंतप्रधान मोदींना केला फोन !
Israel-Iran War : इराणवरील हल्ल्यानंतर इस्रायलचे पंतप्रधान नेतान्याहू यांनी पंतप्रधान मोदींना केला फोन !

इराण आणि इस्रायलच्या युद्धानं (Israel-Iran War) एक वेगळं वळण घेतलं आहे. इस्रायलनंतर आता इराणने प्रतिहल्ला केला आहे. इस्रायलने त्यांच्या अणुप्रकल्पांवर केलेल्या हवाई हल्ल्यानंतर इराणने शुक्रवारी (13 जून 2025) रात्री उशिरा शेकडो बॅलिस्टिक क्षेपणास्त्रे डागून मोठा प्रत्युत्तरात्मक हल्ला केला. (Israel-Iran War)

पंतप्रधान नरेंद्र मोदींना फोन
इराणने अण्वस्त्र कार्यक्रमावरील अमेरिकेसोबतची चर्चा बंद करण्याचा निर्णय घेतला असून इस्त्रायलविरोधात युद्धाची तयारी सुरु केली आहे. या तणावाच्या पार्श्वभूमीवर इस्रायलने पंतप्रधान नरेंद्र मोदींना फोन करून परिस्थितीची माहिती दिली आहे. इस्त्रायल आणि इराण दोन्ही देश भारताचे चांगले मित्र आहेत. भारताने देखील ऑपरेशन सिंदूरनंतर या देशांना फोन करून हल्ल्याची माहिती दिली होती. (Israel-Iran War)

स्थैर्य राखावे
इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांनी या हल्ल्यानंतर मोदींनी फोन केला होता. याची माहिती मोदींनी आपल्या एक्स अकाऊंटवर दिली आहे. ‘मला इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहू यांचा फोन आला. त्यांनी मला सध्याच्या परिस्थितीची माहिती दिली. मी भारताच्या चिंता व्यक्त केल्या आणि या प्रदेशात शांतता आणि स्थैर्य लवकरात लवकर प्रस्थापित करण्याच्या गरजेवर भर दिला,’ असे पंतप्रधान मोदी म्हणाले आहेत. (Israel-Iran War)

“ऑपरेशन रायझिंग लायन”
शुक्रवारी, इस्रायलने इराणच्या अणु पायाभूत सुविधा, क्षेपणास्त्र प्रणाली आणि लष्करी कमांडच्या महत्त्वाच्या घटकांना लक्ष्य करण्यासाठी “ऑपरेशन रायझिंग लायन” सुरू केले. इस्रायली पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहू यांनी या कारवाईचे वर्णन “एक अतिशय यशस्वी सुरुवातीचा हल्ला” असे केले. या हल्ल्यात जनरल अमीर अली हाजीजादेह, मेजर जनरल मोहम्मद बघेरी, मेजर जनरल हुसेन सलामी आणि मेजर जनरल घोलम अली रशीद यांच्यासह अनेक वरिष्ठ लष्करी कमांडर आणि अणुशास्त्रज्ञांचा मृत्यू झाल्याचे वृत्त आहे. (Israel-Iran War)

इस्रायली हल्ल्यांमध्ये इराणच्या अणुऊर्जा संघटनेचे माजी प्रमुख फेरेदून अब्बासी यांच्यासह सहा अणुशास्त्रज्ञांनाही आपले प्राण गमवावे लागले. मोहम्मद मेहदी तेहरानची (सैद्धांतिक भौतिकशास्त्रज्ञ आणि शाहिद बेहेश्ती विद्यापीठाचे माजी रेक्टर) आणि इतर अणुशास्त्रज्ञ अब्दुलहमीद मिनुचेहर, अहमदरेझा झोल्फघारी, सय्यद अमीरहोसेन फकी आणि मोतलाबिझादेह यांचाही या हल्ल्यात मृत्यू झाला आहे. (Israel-Iran War)

इराणकडून कठोर बदला घेण्याची धमकी
इस्रायलच्या हल्ल्यांवर प्रतिक्रिया देताना, इराणने म्हटले आहे की ‘त्यांच्या प्रत्युत्तरात कोणत्याही मर्यादा नाहीत. आता अल-कुड्स जेरुसलेमवर कब्जा करणाऱ्या दहशतवादी राजवटीने सर्व लाल रेषा ओलांडल्या आहेत. या गुन्ह्याला प्रत्युत्तर देण्याच्या कोणत्याही मर्यादा नाहीत.’ असे इराणी सशस्त्र दलाच्या जनरल स्टाफने एका निवेदनात म्हटले आहे. इराणचे सर्वोच्च नेते अयातुल्ला अली खामेनी यांनी इशारा दिला आहे की, हल्ल्यांसाठी इस्रायलला कठोर शिक्षा भोगावी लागेल. इराणच्या सशस्त्र दलाच्या प्रवक्त्याने सांगितले की, “अमेरिका आणि इस्रायल दोघांनाही मोठी किंमत मोजावी लागेल.” (Israel-Iran War)

हेही पहा-

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.