कॅनडा (Canada) पॅलेस्टिनींच्या (Palestine) आत्मनिर्णयाच्या अधिकाराला मान्यता देतो आणि एक सार्वभौम, स्वतंत्र, व्यवहार्य, लोकशाही आणि प्रादेशिकदृष्ट्या संलग्न पॅलेस्टिनी (Palestine) राज्याच्या निर्मितीला पाठिंबा देतो. कॅनडा अशा वेळी पॅलेस्टिनला (Palestine) देश म्हणून मान्यता देण्यास तयार आहे, जेव्हा इस्त्रायल आणि हमास यांच्या युद्ध पेटलेले आहे. कॅनडा (Canada) पॅलेस्टिनी (Palestine) लोकांचा प्रमुख प्रतिनिधी म्हणून पॅलेस्टिनी मुक्ती संघटनेला (पीएलओ) देखील मान्यता देतो. कॅनडा पॅलेस्टिनी प्राधिकरणाच्या पंतप्रधानांच्या नेतृत्वाखालील सरकारसोबत अत्यंत आवश्यक सुधारणांच्या बाबतीत काम करत आहे. त्याच्या भागीदारांसोबत आणि संयुक्त राष्ट्रसंघ, त्याच्या एजन्सी आणि इतर संघटनांद्वारे काम करून, कॅनडा पॅलेस्टिनी (Palestine) लोकांच्या मानवतावादी आणि विकासात्मक गरजांना पाठिंबा देत आहे. त्यामुळे इस्त्रायलने कॅनडावर (Canada) पलटवार केला आहे. कॅनडाने जर ही भूमिका घेतली असेल तर इस्त्राईल कॅनडाला अमेरिकेचा अविभाज्य भाग समजतो, असे इस्त्रायलने म्हटले आहे.
त्यामुळे इस्राइलने आता कॅनडाच्या (Canada) वर्मावर घाव घातला आहे. इस्राइलही कॅनडा हा अमेरिकेचा भाग आहे, अशी भूमिका घेईल असे म्हटले आहे. डोनाल्ड ट्रम्प यांनी X वर एक पोस्ट केली आहे. त्यामध्ये म्हटले की, कॅनडाने अमेरिकेचे ५१ वे राज्य बनावे. यामुळे कर कमी होतील आणि लष्करी शक्ती मोफत वाढेल. त्यासाठी कॅनडाने (Canada) त्यांच्या निवडणुकीत अशा असा नेता निवडा ज्याच्याकडे तुमचे कर अर्ध्यावर कमी करण्याची, तुमची लष्करी शक्ती मोफत, जगातील सर्वोच्च पातळीपर्यंत वाढवण्याची, तुमची कार, स्टील, अॅल्युमिनियम, लाकूड, ऊर्जा आणि इतर सर्व व्यवसाय आकाराने चौपट करण्याची ताकद असेल पण हे कॅनडा अमेरिकेचे ५१ वे राज्य बनले तरच साध्य होईल. त्यावर कॅनडामध्ये विरोधी भावना आहे, कॅनडाच्या (Canada) अस्तित्वावर हा घाला आहे, अशी भावना आहे. आता इस्त्रायलने कॅनडाच्या वर्मावर बोट ठेवले आहे.
Join Our WhatsApp Community