शुक्रवारी सकाळी इस्रायली हवाई हल्ल्यानंतर इराणच्या (Iran) अणू ऊर्जा संघटनेने (AEOI) पुष्टी केली आहे की, इराणच्या अण्वस्त्र केंद्रातून या हल्ल्यामुळे रेडिएशनची गळती झाल्याचे आढळून आले असल्याचे सांगितले. इराणी हद्दीत केलेल्या व्यापक इस्रायली लष्करी कारवाईचा भाग असलेल्या या हल्ल्यात इराणचे अनेक वरिष्ठ लष्करी कमांडर आणि किमान सहा अणुशास्त्रज्ञांचा मृत्यू झाला.
AEOI चे प्रवक्ते बेहरूझ कमालवंदी यांच्या मते, ही रेडिएशनची गळती नियंत्रणेच्या बाहेर गेलेली नाही आणि त्यामुळे जनतेला कोणताही धोका नाही. आम्हाला अणुऊर्जा केंद्रातील किरणोत्सर्ग साफ करायचा आहे आणि नंतर नुकसानीचे मूल्यांकन करायचे आहे, असे त्यांनी एका दूरचित्रवाणीला दिलेल्या मुलाखतीत म्हटले आहे. जरी या ठिकाणी पृष्ठभागावरील काही नुकसान झाले असले तरी, भूमिगत युरेनियमचा साठा शाबूत आहे आणि त्या संरक्षित विभागांमध्ये कोणतीही जीवितहानी झाली नाही. तेहरानपासून सुमारे २२० किलोमीटर आग्नेयेस इस्फहान प्रांतात स्थित अणुसंकुल हे इराणचे (Iran) मुख्य युरेनियम साठा केंद्र आहे. हे केंद्र २००२ मध्ये गुप्तपणे बांधलेले आहे आणि ८ मीटर जमिनीखाली आहे. AEOI चे प्रवक्ते बेहरूझ कमालवंदी यांनी किरणोत्सर्ग झाल्याचे कबूल केले तरी AEOI चे प्रमुख मोहम्मद इस्लामी यांनी वैयक्तिकरित्या साइटची पाहणी केली आणि नुकसान वरवरचे असल्याचे सांगितले.
Join Our WhatsApp Community