Islamabad Peace Talk पाकड्यांना महागात पडले; हॉटेलचे बिल भरणे शरीफ-मुनीरच्या नाकीनऊ आले

पाकिस्तानने अत्यंत थाटामाटात अमेरिका आणि इराण यांच्यात मध्यस्थी करण्यासाठी या अमेरिका-इराण शांतता चर्चा (Islamabad Peace Talk) आयोजन केले होते. मात्र, चर्चा संपल्यानंतर या पंचतारांकित हॉटेलचे बिल भरण्यास शहबाज शरीफ सरकार अपयशी ठरले.

92
Islamabad Peace Talk at Serena Hotel with key figures.
The Islamabad Peace Talk faced unexpected challenges.

एका बाजूला जागतिक महासत्तांमधील मध्यस्थीचा आव आणायचा आणि दुसऱ्या बाजूला पाहुण्यांच्या चहा-पाण्याचे बिलही भरता न येणे, अशा नामुष्कीजनक परिस्थितीचा सामना सध्या पाकिस्तानला करावा लागत आहे. इस्लामाबादमधील प्रतिष्ठित सेरेना हॉटेलमध्ये झालेली अमेरिका-इराण शांतता चर्चा (Islamabad Peace Talk) पाकिस्तानसाठी ‘राजनैतिक यश’ ठरण्याऐवजी ‘जागतिक विडंबना’ ठरली आहे. ही चर्चा फिस्कटली, त्यामुळे यातून श्रेय मिळवण्याची संधी पाकड्यांची हुकली, त्यामुळे तेल गेले, तूप गेले हाती धुपाटणे आले, अशी अवस्था पाकिस्तानचे पंतप्रधान शहाबाज शरीफ आणि लष्करप्रमुख मुल्ला असीम मुनीर यांची झाली आहे. (Islamabad Peace Talk)

नेमका प्रकार काय?

पाकिस्तानने अत्यंत थाटामाटात अमेरिका आणि इराण यांच्यात मध्यस्थी करण्यासाठी या अमेरिका-इराण शांतता चर्चा (Islamabad Peace Talk) आयोजन केले होते. मात्र, चर्चा संपल्यानंतर या पंचतारांकित हॉटेलचे बिल भरण्यास शहबाज शरीफ सरकार अपयशी ठरले. शेवटी, हॉटेल मालकाला (आगा खान डेव्हलपमेंट नेटवर्कचे सदस्य) स्वतः हस्तक्षेप करून संपूर्ण खर्च सोसावा लागला.

(हेही वाचा युद्धातील नुकसानीची अरब देशांनी भरपाई द्यावी; Iran ची मागणी)

जगाला आपली राजनैतिक ताकद दाखवण्याचे स्वप्न पाहणाऱ्या पाकिस्तानचे आर्थिक वास्तव जमिनीवर आले आहे. साधे हॉटेल बिल न भरू शकल्याने प्रशासकीय पातळीवरील दिवाळखोरी उघड झाली आहे. जे देश स्वतःच्या खर्चावर आंतरराष्ट्रीय कार्यक्रम करू शकत नाहीत, ते दोन देशांतील युद्ध कसे थांबवणार? असा खोचक सवाल राजनैतिक तज्ज्ञांकडून उपस्थित केला जात आहे. पाकिस्तान सध्या ७ ते ९ टक्के महागाई आणि आयएमएफच्या कडक अटींखाली दबलेला आहे. मात्र, अशा महत्त्वाच्या कार्यक्रमात झालेली ही चूक देशाच्या प्रतिमेला काळा डाग लावणारी ठरली आहे. (Islamabad Peace Talk)

या घटनेने हे सिद्ध केले आहे की, पाकिस्तानची आर्थिक परिस्थिती आता त्याच्या परराष्ट्र धोरणावरही भारी पडत आहे. विश्वासार्ह मध्यस्थ म्हणून मिरवण्याच्या नादात पाकिस्तानने स्वतःचेच हसे करून घेतले आहे. चीन आणि अमेरिकेच्या राजकारणात स्वतःचे स्थान शोधणाऱ्या पाकिस्तानला आता स्वतःच्या तिजोरीतील खडखडाट लपवणे कठीण झाले आहे. (Islamabad Peace Talk)

 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.