जम्मू-काश्मीरमधील पहलगाममध्ये झालेल्या हल्ल्यानंतर भारत सरकारकडून सिंधू करारावर (Indus Water Treaty) स्थगिती देण्यात आली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत पार पडलेल्या केंद्रीय मंत्रिमंडळाच्या सुरक्षा समितीच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. अमेरिकेच्या मध्यस्थीने दोन्ही देशांनी युद्धबंदीवर सहमती दर्शवली आहे. पण, यानंतर भारत सिंधू जल करार पुन्हा लागू करेल का ? असा प्रश्न सध्या उपस्थित होत आहे. (Indus Water Treaty)
हेही वाचा-पाकच्या पंतप्रधानांनी मानले सहयोगी देशांचे आभार ; Shehbaz Sharif आणि सैन्य दलात संघर्ष सुरूच …
भारत सरकारकडून अद्याप यावर कोणतेही अधिकृत विधान आलेले नाही. भारताने कोणत्याही अटीशिवाय युद्धबंदी करण्यास सहमती दर्शवल्याचे बोलले जात आहे. युद्धबंदीच्या घोषणेनंतर, भारताचे परराष्ट्र सचिव विक्रम मिस्री म्हणाले होते की दोन्ही देशांच्या लष्करी ऑपरेशन्स महासंचालकांमध्ये (डीजीएमओ) युद्धबंदीबाबत चर्चा झाली. दोन्ही डीजीएमओंमधील पुढील चर्चा १२ मे रोजी होईल. (Indus Water Treaty)
१२ मे होणाऱ्या चर्चेत दोन्ही देश राजनैतिक आणि लष्करी पातळीवर अनेक फेऱ्यांमध्ये चर्चा करतील. सिंधू जल करारावरही चर्चा होईल. दोन्ही देश आपली बाजू मांडतील. जेव्हा दोन्ही पक्ष सहमत होतील, तेव्हा ते देखील पुनर्संचयित केले जाईल. असा अंदाज वर्तवण्यात येत आहे. (Indus Water Treaty)
हेही पहा-
Join Our WhatsApp Community