Indian Railways : रेल्वेच्या 32 हजार कोटींच्या सात प्रकल्पांना केंद्रीय मंत्रिमंडळाची मंजुरी

86
Indian Railways : रेल्वेच्या 32 हजार कोटींच्या सात प्रकल्पांना केंद्रीय मंत्रिमंडळाची मंजुरी

बुधवार १६ ऑगस्ट रोजी झालेल्या केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत काही महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले. या बैठकीत केंद्रीय मंत्रिमंडळाने विविध योजनांना मंजुरी दिली. यामध्ये (Indian Railways) भारतीय रेल्वेच्या 32 हजार 500 कोटींच्या सात प्रकल्पांना मंजुरी देण्यात आली आहे. या प्रकल्पासाठीचा 100 टक्के खर्च हा केंद्र सरकार करणार आहे. या प्रकल्पात महाराष्ट्रातील 50 किमीच्या अंतराचा समावेश आहे.

रेल्वेचे जाळे 2339 किलोमीटरने वाढणार

रेल्वेच्या (Indian Railways) या प्रकल्पामुळे प्रवाशांना फायदा होणार आहे. या प्रकल्पामुळे सध्याची मार्ग क्षमता वाढवणे, रेल्वे गाड्यांचे कार्यान्वयन सुरळीत करणे, गर्दी कमी करणे आणि प्रवास तसेच वाहतूक सुलभ करण्यासाठी मोठी मदत होणार आहे. उत्तर प्रदेश, बिहार, तेलंगणा, आंध्र प्रदेश, महाराष्ट्र, गुजरात, ओडिशा, झारखंड आणि पश्चिम बंगाल या 9 राज्यांमधील 35 जिल्ह्यांचा या प्रकल्पामध्ये समावेश आहे. यामुळे रेल्वेचे जाळे 2339 किलोमीटरने वाढणार असल्याची माहिती केंद्र सरकारने दिली आहे.

(हेही वाचा – Sudhir Mungantiwar : शारीरिक व मानसिक स्वास्थ्यासाठी रानभाज्याच्यांचे करा सेवन – सुधीर मुनगंटीवार)

मार्गांचे दुहेरीकरण होणार

केंद्र सरकारने मंजूर केलेल्या प्रकल्पामध्ये राज्यातील मुदखेड-मेडचल-मेहबुबनगर-ढोण या मार्गाचा समावेश आहे. या मार्गाचे दुहेरीकरण (Indian Railways) करण्यात येणार आहे. यात राज्यातील 50 किमीचे अंतर आहे.

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.