भारतीय वायूदलाचं Operation Sindhoor सुरुच !

भारतीय वायूदलाचं Operation Sindhoor सुरुच !

85
भारतीय वायूदलाचं Operation Sindhoor सुरुच !
भारतीय वायूदलाचं Operation Sindhoor सुरुच !

ऑपरेशन सिंदूर (Operation Sindhoor) अजूनही संपलेलं नाही, अशी अधिकृत भूमिका भारतीय वायूदलाकडून स्पष्ट करण्यात आली आहे. भारत आणि पाकिस्तानमधील तणावाच्या पार्श्वभूमीवर युद्धबंदी जाहीर करण्यात आली आहे. भारत आणि पाकिस्तानमधील तणावात अमेरिकेने मध्यस्थी केली. त्यानंतर भारत आणि पाकिस्तानने काल (10 मे) सायंकाळी युद्धबंदी जाहीर केली. मात्र युद्धबंदीनंतरही भारताचं ऑपरेशन सिंदूर (Opration Sindhoor) सुरुच राहणार असल्याचं भारतीय वायूदलाकडून स्पष्ट करण्यात आलं आहे. (Operation Sindhoor)

ऑपरेशन सिंदूर (Operation Sindhoor) अजूनही संपलेलं नाही. आतापर्यंत दिलेली जबाबदारी वायूदलानं चोखपणे बजावली आहे. तसेच कुठल्याही अफवांवर विश्वास न ठेवण्याचं आवाहन देखील भारतीय वायूदलाने केलं आहे. भारतासोबत शस्त्रसंधी केल्यानंतर अवघ्या तीन तासांत सीमेवर गोळीबार करत, पाकिस्तानने शस्त्रसंधीचं उल्लंघन केलं. पुन्हा एकदा सीमेलगतच्या चार राज्यांमध्ये पाकिस्तानी ड्रोन पाहायला मिळाले. मात्र त्यांचा हा हल्ला भारतीय सेनेने परतवून लावला. (Operation Sindhoor)

हेही वाचा-Rajkot किल्ल्यावरील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते लोकार्पण !

पाकिस्तानकडून शस्त्रसंधीचं उल्लंघन झाल्यानंतर, तात्काळ केंद्रीय गृहमंत्रालयात बैठक बोलावण्यात आली. भारत-पाक तणावाच्या पार्श्वभूमीवर गृह सचिवांची महत्त्वाची बैठक पार पडली. या बैठकीला जवळपास सर्वच राज्यांचे मुख्य सचिव व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे बैठकीला उपस्थित होते. प्रत्येक राज्यातील सिव्हिल डिफेंस यंत्रणेला अलर्ट मोडवर ठेवण्याचा निर्णय या बैठकीत झाला. तसंच सीमेला लागून असलेल्या राज्यांनाही कोणत्याही परिस्थितीचा सामना करण्यासाठी तयार राहण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. (Operation Sindhoor)

हेही पहा-

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.