
पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानला (India Vs Pakistan War) आणखी एक मोठा धक्का बसला आहे. पाकिस्तानने भारतासाठी आपले हवाई क्षेत्र बंद केल्यानंतर आता फ्रेंच आणि जर्मन परदेशी विमान कंपन्यांनी पाकिस्तान मार्गे हवाई उड्डाणे स्थगित केले आहेत. तसेच त्यांनी या प्रदेशातील त्यांचे कामकाजही स्थगित केले आहे. भारत आणि पाकिस्तानमधील वाढत्या तणावाच्या पार्श्वभूमीवर या परदेशी विमान कंपन्यांनी हा निर्णय घेतला आहे. (India Vs Pakistan War)
हेही वाचा-India Vs Pakistan War Mock Drill : महाराष्ट्रात ‘या’ १६ ठिकाणी होणार मॉकड्रील !
मीडिया रिपोर्टनुसार, फ्रेंच आणि जर्मन विमान कंपन्या एअर फ्रान्स आणि लुफ्थांसाने पाकिस्तानी हवाई हद्दीतून उड्डाण करण्यास नकार दिला आहे. एअर फ्रान्सने एका निवेदनात म्हटले की, भारत आणि पाकिस्तानमधील तणावामुळे पुढील सूचना मिळेपर्यंत पाकिस्तानवरून उड्डाणे स्थगित करण्याचा निर्णय एअर फ्रान्सने घेतला आहे. दरम्यान, लुफ्थांसानेही अशाचप्रकारचे निवेदन जारी केले आहे. (India Vs Pakistan War)
परदेशी विमान कंपन्यांच्या मते, दोन्ही देशांमध्ये युद्धाची शक्यता आहे. यामुळे हवाई हल्ले होतील. म्हणून सुरक्षेच्या कारणास्तव पाकिस्तानच्या हवाई हद्दीपासून दूर राहण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. जर्मनीच्या लुफ्थांसा विमान कंपनीने म्हटले आहे की, सध्या पाकिस्तानच्या हवाई हद्दीतून विमाने उड्डाण करणार नाहीत. (India Vs Pakistan War)
हेही वाचा- India-Pakistan War : ७ मे ला देशात ‘मॉक ड्रिल’ आदेश ; याआधी केव्हा करण्यात आले होते ?
दरम्यान, फ्लाइट ट्रॅकिंग डेटावरून असे दिसून आले की, ब्रिटिश एअरवेज, स्विस इंटरनॅशनल एअरलाइन्स आणि एमिरेट्सची काही विमाने अरबी समुद्रावरुन गेल्यानंतर पाकिस्तानी हवाई हद्द टाळत आहेत. दरम्यान, विमान कंपन्यांच्या या निर्णयामुळे पाकिस्तानला ओव्हरफ्लाइट शुल्कातून मिळणारा महसूल कमी होईल. तसेच भारताने पाकिस्तानी विमान कंपन्यांसाठीही आपले हवाई क्षेत्र बंद केले आहे. यामुळे देखील पाकिस्तानला मोठे नुकसान झेलावे लागत आहे. (India Vs Pakistan War)
हेही पहा-
Join Our WhatsApp Community