पाकपुरस्कृत दहशतवाद्यांनी काश्मीरमधील पहलगाम येथे दहशतवादी हल्ला केल्यानंतर भारताने ऑपरेशन सिंदूर राबवून ८६ तासांच्या लष्करी कारवाईने पाकिस्तानला (Pakistan) गुडग्यावर आणले. मात्र त्याआधी भारताने सिंधू नदी पाणी करार स्थगित करून पाकिस्तानवर आधीच वॉटर बॉम्ब टाकला होता. त्याचा परिणाम आता ऑपरेशन सिंदूर नंतर होताना दिसू लागला आहे. भारताने जसजसे सिंधू नदीचे पाणी थांबवण्यास सुरुवात करताच पाकिस्तानचे (Pakistan) धाबे दणाणू लागले आहे. अणू हल्ल्याच्या धमकी देणाऱ्या पाकिस्तानची आता भाषा दाबलू लागली आहे.
भारत आणि पाकिस्तानमध्ये (Pakistan) गेल्या अनेक दशकांपासून सुरू असलेला सिंधू नदी पाणी करार यानिमित्ताने चर्चेत आला आहे. भारताचा हा करार स्थगित करण्याच्या निर्णयानंतर आता पाकिस्तानच्या संसदेत हा मुद्दा चर्चेला आला आहे. पाकिस्तानी खासदार सय्यद अली जफर यांनी संसदेत कबूल केले की, जर आपण पाण्याचा प्रश्न सोडवू शकलो नाही तर आपण उपासमारीने मरू… सिंधू खोरे ही आपली जीवनरेखा आहे. ९० टक्के शेती या पाण्यावर अवलंबून आहे. आपल्यावर पाण्याचा बॉम्ब टाकण्यात आला आहे, जो निष्काम केला पाहिजे. पाण्याअभावी चिडलेला पाकिस्तान (Pakistan) आता भारतासमोर विनवणी करत आहे.
खासदार सय्यद शिबली फराज म्हणतात की, पाण्याचा प्रश्न शक्य तितका गांभीर्याने घेतला पाहिजे. दुसरीकडे, पाकिस्तानी सैन्याचा सूरही बदलला आहे. पाकिस्तानी खासदार अली जफर यांचा असा विश्वास आहे की जागतिक बँकेचे माजी प्रमुख यांच्या शब्दात, २० व्या शतकातील युद्धे तेलावर झाली होती, २१ व्या शतकातील युद्धे पाण्यावर होतील आणि पाकिस्तान (Pakistan) सध्या जगातील सर्वात जास्त पाणीटंचाई असलेल्या देशांमध्ये आहे. १९६० मध्ये झालेल्या या करारानुसार, रावी, बियास आणि सतलज नदी भारताला देण्यात आली होती, तर सिंधू, झेलम आणि चिनाब पाकिस्तानला देण्यात आली होती. परंतु या नद्या भारतातून वाहतात, त्यामुळे भारताचे त्यांच्यावरही नियंत्रण आहे. आता भारताने रक्त आणि पाणी एकत्र वाहू शकत नाही असा कडक संदेश दिला आहे, जोपर्यंत पाकिस्तान (Pakistan) त्याच्या भूमीवर जन्मलेल्या दहशतवाद्यांना पाठिंबा देणे थांबवत नाही तोपर्यंत पाकिस्तानला सिंधूच्या पाण्याचा फायदा मिळणार नाही. जोपर्यंत पाकिस्तान दहशतवादविरुद्ध ठोस पावले उचलत नाही तोपर्यंत सिंधू पाणी करार स्थगित राहील.
Join Our WhatsApp Community