पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर पाकिस्तानचा (Pakistan) समर्थक तुर्कीला भारताने कडक तीव्र शब्दात सुनावले. पाकिस्तानला दहशतवादाला पाठिंबा देणे थांबवण्यास सांगा. भारताला अपेक्षा आहे की, तुर्की पाकिस्तानला दहशतवादाला पाठिंबा देणे थांबवावे आणि दहशतवादी यंत्रणेविरुद्ध कारवाई करावी, यासाठी जोरदार आग्रह करेल, अशा शब्दांत परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते रणधीर जयस्वाल म्हणाले.
पाकिस्तान (Pakistan) तणावात अमेरिकेने मध्यस्थी केली, या डोनाल्ड ट्रम्प यांच्या दाव्यावर रणधीर जयस्वाल म्हणाले, मी माझ्या मागच्या संभाषणात म्हटले होते की, हा मुद्दा फक्त भारत आणि पाकिस्तानचा आहे, यामध्ये कोणत्याही तिसऱ्या देशाची गरज नाही. चर्चा आणि दहशतवाद एकत्र चालू शकत नाही. आम्ही जम्मू-काश्मीरच्या कोणत्याही मुद्द्यावर तिसऱ्या देशाची मध्यस्थी स्वीकारणार नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले. ते पुढे म्हणतात, जम्मू काश्मीर हा भारताचा अविभाज्य भाग आहे. आता यापुढे पाकिस्तानसोबत (Pakistan) चर्चा होणारा एकमेव मुद्दा म्हणजे पीओके रिकामा करणे. पाकिस्तानला (Pakistan) पीओके परत करावाच लागेल. पाकिस्तान दहशतवाद थांबवत नाही, तोपर्यंत सिंधू पाणी करार निलंबित राहील. रक्त आणि पाणी एकत्र वाहू शकत नाही, असेही त्यांनी म्हटले.
Join Our WhatsApp Community