
ऑपरेशन सिंदूरला घाबरून पाकड्यांची पळता भुई थोडी झाली होती. प्रतिहल्ल्यांनी पाकिस्तानी (India Pakistan War) सैन्याची दाणादाण उडाल्यानंतर भारत आणि पाकिस्तान यांच्यात शनिवारी संध्याकाळी शस्त्रसंधी करण्याचा करार झाला होता. अमेरिकेच्या मध्यस्थीने युद्धविराम झाला. मात्र, शस्त्रसंधी लागू झाल्यानंतर अवघ्या काही तासांमध्येच पाकिस्तानने भारतावर पुन्हा एकदा ड्रोन हल्ला केला. पाकिस्तानने शस्त्रसंधी असूनही केलेल्या या हल्ल्यांमुळे सोशल मीडियावर अनेक संतप्त प्रतिक्रिया उमटताना पाहायला मिळाल्या. (India Pakistan War)
View this post on Instagram
या सगळ्यामध्ये अभिनेता हृतिक रोशनच्या ‘लक्ष्य’ चित्रपटातील एका डायलॉगची क्लीप चांगलीच व्हायरल होताना दिसली. “कप्तान साहब, मुझे ऊन लोगो का तजुर्बा है. अगर जीत जाओ तो फौरन नापर्वा नही हो जाना. पाकिस्तानी हारे तो पलटके एक बार फिर आता है. मेरी बात याद रखना”, असा हा डायलॉग आहे. अभिनेते ओम पुरी आणि हृतिक रोशन (hrithik roshan) यांच्यातील हा संवाद तंतोतंत खरा ठरताना दिसत आहे. (India Pakistan War)
हेही वाचा-Baluch Liberation Army : इकडे युध्दविराम तर तिकडे बलुच आर्मीचं पाकिस्तानबाबत खळबळजनक विधान
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी शनिवारी ‘एक्स’ या सोशल प्लॅटफॉर्मवर पोस्ट करुन भारत आणि पाकिस्तान युद्धबंदीसाठी राजी झाल्याचे जाहीर केले होते. त्यानंतर भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाकडून पत्रकार परिषद घेण्यात आली होती. त्यावेळी भारताचे परराष्ट्र सचिव विक्रम मिस्री यांनी माहिती देताना सांगितले होते की, पाकिस्तानच्या संरक्षण विभागातील महासंचालकांचा भारतीय महासंचालकांना फोन आला होता. पाकिस्तानकडून 3.35 वाजता फोन आला, त्यानुसार आज सायंकाळी 5 वाजल्यापासून भारत आणि पाकिस्तान यांच्यात शस्त्रसंधी लागू होत असल्याची माहिती विक्रम मिस्री यांनी दिली. (India Pakistan War)
हेही पहा-
Join Our WhatsApp Community