India Pakistan War : भारताची ५ लढाऊ विमाने पाडल्याचा पाकिस्तानचा दावा भारताने फेटाळला !

India Pakistan War : भारताचे ५ लढाऊ विमाने पाडल्याचा पाकिस्तानचा दावा भारताने फेटाळला !

86
India Pakistan War : भारताची ५ लढाऊ विमाने पाडल्याचा पाकिस्तानचा दावा भारताने फेटाळला !
India Pakistan War : भारताची ५ लढाऊ विमाने पाडल्याचा पाकिस्तानचा दावा भारताने फेटाळला !

भारताने ‘ऑपरेशन सिंदूर’ अंतर्गत पाकिस्तानातील (India Pakistan War) ९ दहशतवादी तळ उध्वस्त केले आहे.यानंतर आता पाकिस्तानने भारताचे ५ लढाऊ विमाने पाडल्याचा दावा केला आहे. पाकिस्तानचे पंतप्रधान शहबाज शरीफ यांनी संसदेत याबाबत माहिती दिली आहे. परंतु भारताने हा दावा फेटाळून लावला आहे. (India Pakistan War)

हेही वाचा-“राज ठाकरे जे काही व्यक्त होत गेले त्यात देशप्रेम दिसतंय का ? ” ; Gunaratna Sadavarte यांचा सवाल

पाकिस्तानचे पंतप्रधान शहबाज शरीफ यांनी सांगितले की, मी आपले एअर चीफ जहीर बाबर यांना मी तुमच्याकडून, पाकिस्तनच्या संपूर्ण जनतेकडून सलाम करत आहोत की त्यांनी आणि त्यांच्या टीमने हिंदुस्तानच्या ५ लढाऊ विमानांना पाडले आहे. त्यात ३ राफेलचा समावेश आहे. हिंदुस्थाननेन जेव्हा रात्री पाकिस्तानवर हल्ला केला. पाकिस्तानमधील ६ शहरांना टार्गेट केले तेव्हा पाकिस्तानच्या एअर चीफने हे काम केले आहे. (India Pakistan War)

हेही वाचा- Pahalgam Terror Attack : NIAकडून फोन नंबर जारी, माहिती शेअर करण्याचे नागरिकांना आवाहन

भारताने पाकिस्तानमध्ये ८० विमाने पाठवली होती.यासाठी पाकिस्तानच्या तिन्ही सेना अनेक दिवसांपासून तयारी करत होत्या. ज्यामुळेच पाकिस्तानने भारताची लढाऊ विमाने पाडली, असा दावा त्यांनी केला आहे.परंतु भारताने हा दावा फेटाळला आहे. भारताच्या सैन्याने काल(दि.७) पत्रकार परिषद घेत ही माहिती दिली आहे. ऑपरेशन सिंदूरमध्ये भारताचे तिन्ही सैन्याचे कोणत्याही प्रकारचे नुकसान झाले नसल्याचे त्यांनी सांगितले आहे. (India Pakistan War)

हेही पहा-

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.