
जम्मू आणि काश्मीरमध्ये (India Pakistan War) पाकिस्तानकडून करण्यात आलेल्या गोळीबारामुळे अनेक निर्दोष नागरिकांचा मृत्यू झाला आहे. या दु:खद घटनेवर मुख्यमंत्री कार्यालयाकडून शोक व्यक्त करण्यात आला असून, मृतांच्या कुटुंबीयांना 10 लाख रुपयांची मदत जाहीर करण्यात आली आहे. (India Pakistan War)
Deeply pained by the loss of innocent lives due to recent shelling from Pakistan. My Government is taking every possible measure to minimise the hardship of our people.
While no compensation can ever replace a loved one or heal the trauma caused to the family, as a gesture of…
— Office of Chief Minister, J&K (@CM_JnK) May 10, 2025
मुख्यमंत्री कार्यालयाच्या अधिकृत ट्विटर खात्यावरून करण्यात आलेल्या पोस्टमध्ये म्हटले आहे की, “निर्दोष नागरिकांचे प्राण गेल्याने आम्हाला अत्यंत दु:ख झाले आहे. माझे सरकार आपल्या जनतेची हानी कमी करण्यासाठी शक्य ते सर्व प्रयत्न करत आहे. कोणतीही भरपाई कधीच एखाद्या प्रिय व्यक्तीची जागा घेऊ शकत नाही किंवा कुटुंबावर झालेली मानसिक आघात भरून काढू शकत नाही. मात्र सहानुभूती आणि एकजुटीचा भाव म्हणून मृतांच्या कुटुंबीयांना 10 लाख रुपयांची मदत दिली जाईल.” असेही या निवेदनात नमूद करण्यात आले आहे. (India Pakistan War)
नियंत्रण रेषेजवळील पुंछ भागात काल रात्री जोरदार गोळीबार सुरू होता, ज्यामध्ये एका व्यक्तीचा मृत्यू झाला आणि एक महिला जखमी झाली. नियंत्रण रेषेजवळ पाकिस्तानच्या बाजूकडून झालेल्या गोळीबारात अनेक घरांचं नुकसान झालं आहे. नियंत्रण रेषेजवळील बारामुला, कुपवाडा आणि बांदीपोरा भागात परिस्थिती तणावपूर्ण आहे. कुपवाड्यातील काही सेक्टरमध्ये गोळीबारामुळे इमारतींचे नुकसान झाले आहे. (India Pakistan War)
हेही वाचा- Fact Check : अफवांचा बाजार उठवणाऱ्या पाकिस्तानचा भारतीय सैन्याकडून पुराव्यांसह पर्दाफाश !
या संपूर्ण परिस्थितीत भारतीय लष्कराने जम्मू-कश्मीरमध्ये रेड अलर्ट जाहीर केला असून नागरी प्रशासनाने ब्लॅकआउटची घोषणा केली. त्यामुळे संपूर्ण प्रदेशात रात्री वीज नव्हती. नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण होतं. (India Pakistan War)
हेही पहा-
Join Our WhatsApp Community