India-Pakistan Tension : भारत- पाकिस्तान यांच्यात तणावाची स्थितीत जगभरातून भारताला मोठा पाठिंबा मिळत आहे. मात्र, पाकिस्तानला पाठिंबा देणाऱ्या तुर्कीला भारतीय व्यापाऱ्यांनी धक्का दिला आहे. तुर्कीच्या सफरचंदांवर बॅन, तुर्की बॅन म्हणत व्यापाऱ्यांनी बहिष्कार टाकला आहे. त्यामुळे तुर्की सफरचंद बाजारातून गायब झाली आहेत. इराणमधून येणाऱ्या सफरचंदांचे दर वाढले आहेत. घाऊक बाजारात १० किलो सफरचंदामागे २०० ते ३०० रुपये, तर किरकोळ बाजारात प्रति किलो २० ते ३० रुपये दराने वाढ झाली आहे.
(हेही वाचा DGMO Meeting : भारत-पाकिस्तान डीजीएमओ बैठकीत काय झालं; पाकिस्तानी डीजीएमओची ग्वाही, म्हणाले… )
व्यापाऱ्यांनी तुर्की सफरचंदाऐवजी इराण, वॉशिंग्टन आणि न्यूझलँड सफरचंदाला पसंती दिली आहे. इराण, वॉशिंग्टन आणि न्यूझलँड सफरचंदाच्या भावात पेटीमागे २०० ते ३०० रूपयांची वाढ झाली असल्याची माहिती मार्केट यार्डातील सफरचंदाचे आडतदार, श्री गुरुदेव दत्त फ्रूट एजन्सीचे सत्यजित झेंडे यांनी दिली. मार्केट यार्डात देशासह परदेशातून सफरचंदाची आवक होत असते. भारत-पाकिस्तान तणावामुळे परदेशातील सफरचंदाच्या व्यवहारावरदेखील परिणाम झाला आहे.India-Pakistan Tension
Join Our WhatsApp Community