
भारत-ब्रिटेन यांच्यात मुक्त व्यापार करार(India-Britain FTA) जवळपास निश्चित झाल्यानंतर उभय देशांत व्यापार वृध्दीस चालना मिळणार आहे. मुक्त व्यापार कराराच्या माध्यमातून रोजगार, निर्यात आणि राष्ट्रीय विकासाला चालना मिळणार असून जवळपास ९९ टक्के भारतीय निर्यातीला शून्य शुल्काचा फायदा होईल, असा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. विशेष म्हणजे आयटी/आयटीईएस, वित्तीय सेवा, व्यावसायिक सेवा, इतर व्यवसाय सेवा आणि शैक्षणिक सेवा यासारख्या सेवांमध्ये व्यापाराला लक्षणीय चालना मिळणार आहे.
(हेही वाचा पंजाबच्या AAP सरकारचा हरियाणापाठोपाठ दिल्लीत कृत्रिम पाणीटंचाई निर्माण करण्याचा प्रयत्न )
दरम्यान, केंद्र सरकारच्या वाणिज्य मंत्रालयाकडून भारत-ब्रिटेन मुक्त व्यापार करारा(India-Britain FTA)चे स्वागत करण्यात आले असून जागतिक आर्थिक महासत्ता होण्याच्या ध्येयाच्या दिशेने हे एक महत्त्वाचे पाऊल आहे. केंद्रीय वाणिज्य मंत्री पियुष गोयल म्हणाले, या कराराने दोन मोठ्या अर्थव्यवस्थांमधील न्याय्य आणि महत्त्वाकांक्षी व्यापारासाठी एक नवीन मापदंड स्थापित केला आहे. त्याचबरोबर, हा मुक्त व्यापार करार भारतीय शेतकरी, मच्छीमार, कामगार, एमएसएमई, स्टार्टअप्स आणि नवोन्मेषकांसाठी फायदेशीर ठरेल, असा आशावाददेखील केंद्रीय मंत्र्यांनी व्यक्त केला आहे.
दरम्यान, उभय देशांतील मुक्त व्यापार करारा(India-Britain FTA)मुळे कापड, सागरी उत्पादने, चामडे, पादत्राणे, क्रीडासाहित्य आणि खेळणी, रत्ने आणि दागिने यासारख्या कामगार-केंद्रित क्षेत्रांसाठी आणि अभियांत्रिकी वस्तू, ऑटो पार्ट्स आणि इंजिन आणि सेंद्रिय रसायने यासारख्या महत्त्वपूर्ण क्षेत्रांसाठी मोठ्या प्रमाणात निर्यात संधी खुल्या होणार आहेत. विशेष म्हणजे युकेमध्ये काम करणाऱ्या भारतीय कर्मचाऱ्यांना सामाजिक सुरक्षा देयकांमधून तीन वर्षांची सूट देऊन मोठा दिलासा मिळणार आहे.(India-Britain FTA)
Join Our WhatsApp Community