Loksabha election 2024 : राज ठाकरेंच्या १४ संभाव्य शिलेदारांची यादी आली समोर; मात्र स्वबळावर लढणार का?

महाराष्ट्र नवनिर्माण सेना येत्या लोकसभा निवणुकीच्या रिंगणात आपले १४ उमेदवार उतरवणार आहेत. यांच्या संभाव्य उमेदवारांची यादी नुकतीच अमोर आली आहे. मात्र मनसेही निवडणूक स्वबळावर लढणार का हे मात्र औत्सुक्याचे ठरणार आहे.

255
Loksabha election 2024 : राज ठाकरेंच्या १४ संभाव्य शिलेदारांची यादी आली समोर; मात्र स्वबळावर लढणार का?

आगामी लोकसभा निवडणुकीसाठी सर्वच पक्षांमध्ये वेगाने हालचाली घडत आहे. त्याचप्रमाणे मनसे मध्येही निवडणुकीच्या दृष्टीने बैठका घेणे सुरू आहे. त्यातच नुकतीच मनसे(MNS) अध्यक्ष राज ठाकरे(Raj Thackrey) यांनी पदाधिकऱ्यांसोबत बैठका घेऊन स्वबळावर निवडणूक लढविण्याची तयारी करण्याच्या सूचना दिलेल्या आहेत. त्यातच गेल्या काही दिवसांपासून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि भाजपच्या काही नेत्यांसमवेत राज ठाकरे यांच्या बैठकांचे सत्र सुरु आहे.अशातच आता मनसेच्या लोकसभा निवडणुकीसाठी संभाव्य उमेदवारांची यादी समोर आली आहे. (Loksabha election 2024)

 लोकसभेच्या ४८ पैकी १४ जगावर उमेदवारांची चर्चा झाली असून अंतिम निर्णय मात्र राज ठाकरेच घेणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. यापूर्वी मनसेने २००९ मध्ये १३ जागांवर निवडणूक लढवली होती. २०१४ मध्ये ११ जागांवर तर २०१९ मध्ये निवडणूक लढवली नसली तरी इतर पक्षांच्या विरोधात अनेक सभा घेतल्या होत्या त्यामध्ये त्यांचे लाव रे तो व्हिडीओ यामुळे त्यांच्या सभा चांगल्याच चर्चेत होत्या. त्यामुळे यंदा हे मनसे नक्की स्वबळावर लढणार का अजून कोणाबरोबर हे चित्र मात्र काही दिवसातच स्पष्ट होईल.

(हेही वाचा : Veer Savarkar : हिंदू म्हणून सर्वांना एकत्रित करण्याचे काम सगळ्यांनी केले पाहिजे – अभिनेता रणदीप हुडा)

पुणे लोकसभा मतदार संघाकडे विशेष लक्ष

राज यांचे पुणे लोकसभा मतदार संघाकडेदेखील विशेष लक्ष आहे. राज ठाकरे हे पुणे येथे सातत्याने दौरा करत आहे. या सर्व वातावरणामुळे मनसेचे संभाव्य उमेदवार यादी काय असणार याकडे सर्वांचाच डोळा आहे.

मनसे लोकसभा उमेदवारांची संभाव्य उमेदवारांची यादी
चंद्रपूर – राजू उंबरकर , नाशिक – डॉ. प्रदीप पवार ,कल्याण -राजू पाटील ,ठाणे – अभिजित पानसे ,उत्तर मुंबई -गजानन राणे,ईशान्य मुंबई -संदीप देशपांडे,  उत्तर मध्य मुंबई- संजय तुर्डे, दक्षिण मध्य मुंबई- नितीन सरदेसाई,दक्षिण मुंबई- बाळा नांदगावकर, रायगड-वैभव खेडेकर,पुणे-वसंत मोरे /साईनाथ बाबर, बारामती- सुधीर पाटस्कर, सोपलापूर -दिलीप धोत्रे

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.