
गेल्या काही वर्षात मत्स्योद्योग व बंदरे विकास मंत्री नितेश राणे (Nitesh Rane) यांची प्रतिमा भाजपाचे फायरब्रॅंड नेते अशी झालेली पाहावयास मिळत आहे. महाविकास आघाडीवर टीका असो की हिंदुत्वाचा मुद्दा लावून धरणे असो, नितेश राणे आपली भूमिका स्पष्ट, ठाम आणि आक्रमकपणे मांडत असल्याने पक्षात आणि भाजपाची मातृसंस्था राष्ट्रीय स्वयंसेवक संघात (RSS) राणे यांच्याकडे देशव्यापी राजकारणातील ‘लंबी रेस का घोडा’ म्हणून पाहिले जात असल्याची चर्चा होत आहे. त्यामुळेच भाजपाच्या मातृसंस्थेचा विश्वास आणि पाठिंबा लाभलेले राणे सध्या हिंदुत्वाचा अजेंडा आक्रमकपणे राबवताना दिसत आहेत.
वेगळी ओळख
राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे लाडके मंत्री किंवा blue-eyed boy म्हणून नितेश राणे यांच्याकडे पाहिले जाते. पक्षातील अनेकांना मागे टाकत त्यांनी आपल्या स्पष्टवक्तेपणामुळे आणि प्रखर हिंदुत्ववादी भूमिकेमुळे एक वेगळी ओळख निर्माण केली आहे. सध्या पक्षात अन्य नेत्यांच्या तुलनेत राणे यांनी हिंदुत्वाच्या प्रचार-प्रसाराचे कार्य एकहाती समर्थपणे सांभाळत असल्याचे चित्र दिसत आहे.
(हेही वाचा कुराणचा अवमान केल्या प्रकरणात Wasim Rizvi यांची निर्दोष सुटका; काय होते प्रकरण?)
पाठ्यपुराव्यातील सातत्य
विशेष म्हणजे दिशा सालीयन मृत्यू प्रकरणाचा पाठपुरावा करण्यातील सातत्य असो किंवा उद्धव ठाकरेच काय, तर कॉंग्रेस नेते राहुल गांधी यांच्यावरही थेट आणि उघड टीका करणे असो, राणे हेच कायम आघाडीवर असल्याचे दिसून येते. नितेश (Nitesh Rane) यांनी दिशा सालीयन प्रकरणात सुरुवातीपासून सातत्याने आवाज उठवला असून, सत्य समोर यावे यासाठी विविध माध्यमांतून आणि मंचांवरून मागणी केली आहे. त्यांच्या या भूमिकेमुळे भाजपामध्ये आणि संघातील राणे (Nitesh Rane) यांचे स्थान अधोरेखित होते.
वडिलांच्या पावलावर पाऊल
नितेश (Nitesh Rane) यांचे वडील, माजी मुख्यमंत्री आणि भाजपाचे विद्यमान खासदार नारायण राणे यांनी विरोधी पक्षनेते पदावर काम करीत असताना अनेक कठीण विषयांचा सखोल अभ्यास करून, कठोर परिश्रमाने राज्याचे मुख्यमंत्री, केंद्रीय मंत्री अशा महत्वाच्या सांविधानिक पदांना न्याय देण्याचा प्रयत्न केला. अनेकदा त्यांच्या अभ्यासू वृत्तीचे जाहीर कौतुकही झाले आहे. त्यांच्याच पावलावर पाऊल ठेवत नितेश (Nitesh Rane) यांनीही लहान-लहान गोष्टींचा सखोल अभ्यास करण्यास सुरुवात केली असून गेल्या काही महिन्यातील यांच्या व्यक्तिमत्वात झालेला आमूलाग्र बदल हा लक्षणीय असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात होत आहे.
आक्रमक हिंदुत्ववादी नेता
राजकारणात आक्रमक हिंदुत्ववादी नेता म्हणून त्यांची प्रतिमा अधिकच ठळक होत असून आगामी काही वर्षात नितेश राणे (Nitesh Rane) यांच्याकडे पक्षाकडून मोठ्या जबाबदाऱ्या सोपवल्या जाऊ शकतात, अशी शक्यता नाकारता येत आहे.
Join Our WhatsApp Community