नरेंद्र मोदींकडे पंतप्रधानपद नसते तर, भारताची स्थिती झाली असती श्रीलंकेसारखी – मंगल प्रभात लोढा

91
नरेंद्र मोदींकडे पंतप्रधानपद नसते तर, भारताची स्थिती श्रीलंकेसारखी - मंगल प्रभात लोढा
नरेंद्र मोदींकडे पंतप्रधानपद नसते तर, भारताची स्थिती श्रीलंकेसारखी - मंगल प्रभात लोढा

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वााखाली २०१४ मध्ये भाजपाची सत्ता आल्यामुळेच भारताची आर्थिक स्थिती मजबूत झाली. अन्यथा, भारताची स्थिती श्रीलंका, बांगलादेशप्रमाणे झाली असती, असे मत राज्याचे कौशल्य विकास व पर्यटन मंत्री मंगल प्रभात लोढा यांनी रविवारी, १८ जून रोजी व्यक्त केले.

मोदी@९ अंतर्गत भाजपातर्फे ओवळा-माजिवडा विधानसभा मतदारसंघात आयोजित केलेल्या संयुक्त मोर्चा संमेलनात लोढा बोलत होते. ओवळा-माजिवडा मतदारसंघातील घरांघरांमध्ये भाजपाचा कार्यकर्ता पोहोचून मोदी सरकारच्या योजनांची माहिती देणार असल्याचे मनोहर डुंबरे यांनी प्रास्ताविकात सांगितले.

पंतप्रधान नरेंद्र मोदी हे राष्ट्रप्रेम व अध्यात्म प्रेमाने भारलेले व्यक्तिमत्व आहे. त्यांनी त्याग, तपस्या आणि राष्ट्राबद्दल आस्था असल्याच्या भावनेतून नऊ वर्षांत समर्थ भारत घडविला. जगातील अव्वल पाच राष्ट्रांमध्ये भारताची अर्थव्यवस्था पोहोचविली. मजबूत अर्थव्यवस्थेमुळेच भारताची आर्थिक स्थिती श्रीलंका व बांगलादेशप्रमाणे झाली नाही, असे मत मंत्री लोढा यांनी व्यक्त केले. पंतप्रधान नरेंद्र मोदींचे नऊ वर्षातील पवित्र कार्य घराघरांत पोहोचवावे, असे आवाहन लोढा यांनी कार्यकर्त्यांना केले.

(हेही वाचा – अनेक जनावरे मिळूनही वाघाची शिकार अशक्य; देवेंद्र फडणवीसांचा विरोधकांना टोला)

देशकार्यामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींचे नाणे खणखणीत आहे. देशातील प्रत्येक गरीब व्यक्तीला हक्क मिळवून देण्याचे कार्य मोदींकडून करण्यात आले. कोरोनावरील २२० कोटी डोस मोफत देण्याची कामगिरी केवळ भारतातच घडली, ही बाब नागरिकांना कार्यकर्त्यांनी समजून दिली, असे आवाहन आमदार निरंजन डावखरे यांनी केले. आगामी काळात पुन्हा देशात नरेंद्र मोदींचेच सरकार ही देशाची गरज आहे. त्यादृष्टीने प्रत्येक कार्यकर्त्याने कार्य करावे, असे आवाहन माजी खासदार संजीव नाईक यांनी केले. विरसिंग पारछा यांनी आभार मानले.

२० कोटी नागरिकांना मोदी सरकारचा थेट लाभ

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सरकारने सुरू केलेल्या योजनांमध्ये आतापर्यंत २० कोटी नागरिक लाभार्थी झाले आहेत. या नागरिकांच्या जीवनामध्ये बदल घडविण्याचे संपूर्ण श्रेय पंतप्रधान नरेंद्र मोदींनाच आहे, असे प्रतिपादन राज्याचे पर्यटन मंत्री मंगल प्रभात लोढा यांनी लाभार्थी संमेलनामध्ये काढले. ओवळा-माजिवडा विधानसभा क्षेत्रात झालेल्या लाभार्थी सन्मान सोहळ्यात ते बोलत होते. भाजपाचे मतदारसंघातील निवडणूक प्रमुख मनोहर डुंबरे यांनी प्रास्ताविक, तर संमेलनाचे संयोजक धनंजय सिंह यांनी आभार मानले.

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.