“मुख्यमंत्री व्हावं वाटतं पण योग जुळत नाही” ; Ajit Pawar यांचा भावनिक उद्गार; महिला सन्मान सोहळ्यातून राजकीय संदेश

"मुख्यमंत्री व्हावं वाटतं पण योग जुळत नाही" ; Ajit Pawar यांचा भावनिक उद्गार; महिला सन्मान सोहळ्यातून राजकीय संदेश

61
"मुख्यमंत्री व्हावं वाटतं पण योग जुळत नाही" ; Ajit Pawar यांचा भावनिक उद्गार; महिला सन्मान सोहळ्यातून राजकीय संदेश

“कित्येक वर्षे मलाही मुख्यमंत्री व्हावं वाटतं आहे, पण तो योग कुठेच जुळून आलेला नाही,” अशा शब्दांत उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी आपल्या मनातील भावना मोकळेपणाने व्यक्त करत भावनिक वातावरण निर्माण केले. गौरवशाली महाराष्ट्र महोत्सव-२०२५ च्या दुसऱ्या दिवशी विविध क्षेत्रांतील सात महिलांचा सन्मान करताना पवार यांनी राज्यात महिला मुख्यमंत्री होण्याची अपेक्षा व्यक्त करत सरकारच्या महिला सक्षमीकरणाच्या धोरणाचा पुनरुच्चार केला. (Ajit Pawar)

हेही वाचा-IRCTC च्या नियमात बदल ! आता वेटिंग तिकिट असलेल्यांना स्लीपर आणि एसी कोचमध्ये नो एन्ट्री

कार्यक्रमात पद्मश्री अनुराधा पौडवाल, अभिनेत्री सोनाली कुलकर्णी, पत्रकार राही भिडे, पार्श्वगायिका बेला शेंडे, धावपटू ललिता बाबर, कबड्डीपटू अभिलाषा म्हात्रे आणि नेमबाज राही सरनोबत यांचा सन्मान करण्यात आला. याशिवाय राज्यसभेच्या तालिका सभापती सुनेत्रा पवार यांचाही गौरव करण्यात आला. अजित पवार यांनी या सर्व महिलांच्या योगदानाचे मनापासून कौतुक करताना सांगितले की, महिलांनी प्रत्येक क्षेत्रात आपली ठसठशीत ओळख निर्माण केली आहे. (Ajit Pawar)

हेही वाचा- Lairaee Temple Stampede : गोव्यातील देवी लईराईच्या जत्रोत्सवात चेंगराचेंगरी; 7 जणांचा मृत्यू, 70 जण जखमी

कार्यक्रमात उपस्थित खासदार सुनील तटकरे यांनीही महिलांचा गौरव करताना, “तुमच्या पुरस्काराने आमच्या कार्यक्रमाची उंची वाढवली,” अशा शब्दांत त्यांना शुभेच्छा दिल्या. राही भिडे यांनी ‘दादा मनात आणले तर मुख्यमंत्री नक्की होतील, पण महिलांना ५०% आरक्षण आहे, त्यामुळे राज्यात महिला मुख्यमंत्री व्हावी’ अशी मिश्कील पण मुद्देसूद मागणी केली. (Ajit Pawar)

हेही वाचा- नागरिकांचा सहभाग वाढवून सेवांमध्ये सुलभता आणण्यासाठी BMC करणार एआय तंत्रज्ञानाचा वापर

हा कार्यक्रम केवळ महिला सन्मानाचा नव्हता, तर त्यातून राज्यातील राजकीय आणि सामाजिक विचारांची दिशा अधोरेखित झाली. उपस्थित मंत्र्यांच्या आणि प्रमुख नेत्यांच्या उपस्थितीत हा सोहळा महिलांच्या सन्मानाबरोबरच एक सूचक राजकीय व्याख्यान ठरला. (Ajit Pawar)

हेही पहा-

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.