राज्यमंत्री Yogesh Kadam यांच्या उपस्थितीत शेकडो कार्यकर्त्यांचा शिवसेनेत जाहीर प्रवेश

79
राज्यमंत्री Yogesh Kadam यांच्या उपस्थितीत शेकडो कार्यकर्त्यांचा शिवसेनेत जाहीर प्रवेश
राज्यमंत्री Yogesh Kadam यांच्या उपस्थितीत शेकडो कार्यकर्त्यांचा शिवसेनेत जाहीर प्रवेश

“तुम्ही मला साथ दिलीत, तर ही साथ मी कधीच सोडणार नाही,” अशा शब्दांत महाराष्ट्र राज्याचे राज्यमंत्री योगेश कदम (Yogesh Kadam) यांनी जनतेशी ठाम नातं जोडले. खेड तालुक्यातील भरणे नाका येथे झालेल्या भव्य पक्षप्रवेश सोहळ्यात शेकडो कार्यकर्त्यांनी शिवसेनेत (Shiv Sena) जाहीर प्रवेश केला. यावेळी शिवसेना उपनेते संजयराव कदम (Sanjay Rao Kadam) यांचीही प्रमुख उपस्थिती होती.

या सोहळ्यात खेड तालुक्यातील चाटव, आंबवली, वाडी बीड, नांदवली, किंजळे, हुंबरी (वरची व खालची वाडी), मालेद आणि तिसंगी या गावांतील विविध गटांचे महत्त्वाचे पदाधिकारी शिवसेनेत दाखल झाले. या पदाधिकाऱ्यांमध्ये विश्वासराव कदम, संजय यादव गुरुजी, राजू पाटणे, सखाराम कदम, चंद्रकांत भाऊ कदम, काशिनाथ खोत कदम, श्रीपत व दिनेश चव्हाण, मनोहर खोत कदम, अनंत यादव, सुरेशराव मोरे, दिलीपराव कदम, सुषमा कदम, सुजाता कदम आणि शामसुंदर रघुनाथ कदम यांचा समावेश होता.

(हेही वाचा – Maharashtra SSC, HSC 2025 Result : 10 वी 12 वीचा निकाल कधी लागणार ? वाचा सर्वकाही एका क्लिकवर …)

राज्यमंत्री योगेश कदम (Yogesh Kadam) यांनी यावेळी ठाम शब्दांत सांगितले की, “गावागावात विकासकामांची गती वाढली पाहिजे. रामदास भाई आमदार असताना संपूर्ण तालुका शिवसेनेच्या नेतृत्वाखाली होता. तोच आत्मविश्वास पुन्हा निर्माण करायचा आहे. मंत्री झालो म्हणून मी बदललो नाही, आजही तुमच्याच विश्वासावर उभा आहे.”

कार्यक्रमात शिवसेनेची (Shiv Sena) संघटनात्मक भूमिका, विकासाचे दृष्टिकोन आणि स्थानिक कार्यपद्धतीवर सविस्तर चर्चा झाली. या पक्षप्रवेशामुळे खेड तालुक्याच्या राजकारणात नवचैतन्य निर्माण झाले असून, स्थानिक विकास कार्यांना चालना मिळेल, असा विश्वास ग्रामपातळीवर व्यक्त होत आहे.

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.