देशाच्या सर्वोच्च न्यायमूर्तींकडे किती संपत्ती? Supreme Court कडून संपत्ती जाहीर

देशाच्या सर्वोच्च न्यायमूर्तींकडे किती संपत्ती? Supreme Court कडून संपत्ती जाहीर

119
देशाच्या सर्वोच्च न्यायमूर्तींकडे किती संपत्ती? Supreme Court कडून संपत्ती जाहीर
देशाच्या सर्वोच्च न्यायमूर्तींकडे किती संपत्ती? Supreme Court कडून संपत्ती जाहीर

सर्वोच्च न्यायालयाच्या (Supreme Court ) न्यायमूर्तींनी १ एप्रिल रोजी ‘फुल कोर्ट मीटिंग’मध्ये प्रत्येकाची संपत्ती जाहीर करण्याचा निर्णय घेतला होता. त्यानुसार सोमवारी ५ मे रोजी रात्री सर्वोच्च न्यायालयाच्या संकेतस्थळावर न्यायालयातील सर्व न्यायमूर्तींची संपत्ती जाहीर करण्यात आली आहे. त्यात देशाचे सरन्यायाधीश संजीव खन्ना यांच्यापासून सर्वोच्च न्यायालयातील ३३ पैकी २१ न्यायमूर्तींच्या संपत्तीची यादी देण्यात आली आहे. (Supreme Court )

सरन्यायाधीश संजीव खन्ना यांची संपत्ती किती?
सर्वोच्च न्यायालयाच्या संकेतस्थळावर देण्यात आलेल्या माहितीनुसार सरन्यायाधीश संजीव खन्ना यांच्यानावे बँकेत ५५ लाख ७५ हजार रुपयांचं फिक्स्ड डिपॉझिट आणि १ कोटी ६ लाख रुपयांचा पीपीएफ आहे. याशिवाय, सरन्यायाधीश खन्ना यांच्यानावे दक्षिण दिल्लीत २ बीएचके डीडीए फ्लॅट असून कॉमनवेल्थ गेम्स व्हिलेजमध्ये ४ बीएचके फ्लॅटदेखील आहे. त्याव्यतिरिक्त गुरगावमध्ये त्यांच्या मुलीसह संयुक्त मालकी असलेल्या फ्लॅटमध्ये त्यांच्यानावे ५६ टक्के हिस्सा आहे. हिमाचल प्रदेशमध्ये फाळणीपूर्वीपासूनची त्यांची पिढीजात जमीनदेखील त्यांच्यानावे आहे. (Supreme Court )

न्यायमूर्ती बी. आर. गवई यांची संपत्ती किती?
या यादीमध्ये येत्या काही दिवसांत म्हणजेच १४ मे रोजी सरन्यायाधीशपदाचा कार्यभार स्वीकारणारे न्यायमूर्ती बी. आर. गवई यांच्या संपत्तीचीही माहिती देण्यात आली आहे. त्यानुसार, भावी सरन्यायाधीशांच्या नावे बँकेत १९ लाख ६३ हजारांच्या ठेवी तर पीपीएफ खात्यात ६ लाख ५९ हजार रुपये आहेत. याशिवाय अमरावतीमध्ये पिढीजात घर, मुंबई आणि दिल्लीत फ्लॅट अशा मालमत्तेचा त्यांनी उल्लेख केला आहे. त्याशिवाय, अमरावती आणि नागपूरमध्ये त्यांची पिढीजात शेतजमीनही आहे. तसेच, तब्बल १ कोटी ३० लाखांचं कर्ज त्यांच्या नावावर आहे. (Supreme Court )

हेही वाचा- Maharashtra Weather Update : राज्यात गारपिटीसह अवकाळी पावसाचा तडाखा; ‘या’ शहरांना दिला ‘येलो अलर्ट’

याव्यतिरिक्त २४ मे रोजी निवृत्त होणारे न्यायमूर्ती ए. एस. ओक यांच्या नावे ९२ लाख ३५ हजार पीपीएफ, २१ लाख ७६ हजार एफडी, एक २०२२ चं मॉडेल असलेली मारूती बलेनो कार आणि ५ लाख १० हजारांचं कार लोन आहे. न्यायमूर्ती विक्रम नाथ यांनी आपल्या नावावर नोएडामध्ये २ बीएचके फ्लॅट, अलाहाबादमध्ये एक बंगला आणि उत्तर प्रदेशमध्ये पिढीजात शेतजमीन असल्याचं नमूद केलं आहे. तसेच, दीड कोटींची गुंतवणूकदेखील आहे. न्यायमूर्ती सूर्यकांत यांच्या नावावर चंदीगढ, गुरग्राम आणि दिल्लीत पत्नीसह संयुक्त मालकी असलेल्या मालमत्ता आहेत. तसेच, एफडीमध्ये ६ कोटी ३ लाख रुपये आहेत. (Supreme Court )

हेही वाचा-India-Pakistan War : ७ मे ला देशात ‘मॉक ड्रिल’ आदेश ; याआधी केव्हा करण्यात आले होते ?

न्यायमूर्ती बेला एम. त्रिवेदी यांच्यानावे अहमदाबादमध्ये दोन घरं आहेत. शिवाय, म्युच्युअल फंडमध्ये ६० लाख रुपये, पीपीएफमध्ये २० लाख रुपये, ५० लाखांचे दागिने आणि २०१५ ची मारुती स्विफ्ट कार आहे. न्यायमूर्ती सुधांशू धुलिया यांच्याकडे २००८ चं मॉडेल असलेली मारुती झेन एस्टिलो कार आहे. त्याव्यतिरिक्तची सर्व संपत्ती ही आपण न्यायाधीश बनण्याआधीची असून त्यात कोणतीही भर पडलेली नाही, असं त्यांनी नमूद केलं आहे. (Supreme Court )

हेही पहा-

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.