विरोधकांच्या I.N.D.I.A. कडे NDA पेक्षा किती आहे बळ?

104

आतापासूनच देशात २०२४च्या लोकसभा निवडणुकीचे वारे वाहू लागले आहेत. २०१९च्या निवडणुकीच्या वेळी भाजपविरोधी पक्षांनी एकत्र येऊन मोदींच्या विरोधात मोर्चा उघडला होता, मात्र त्या निवडणुकीत सगळ्यांचं सुपडासाफ झाला होता. आता २०२४साठीही या पक्षांनी पुन्हा एकत्र येण्याचा प्रयत्न सुरु केला आहे. त्याचे नेतृत्व मात्र काँग्रेस करत आहे. या आघाडीला आधी UPA असे नाव होते, आता ते शाब्दिक खेळ करत I.N.D.I.A. ठेवण्यात आले आहे.

या आघाडीची दुसरी बैठक झाली, त्यामध्ये २६ राजकीय पक्षांचा सहभाग होता. मोदी आणि भाजपाला हरवणे या एकमेव उद्देशासाठी ही आघाडी झाली आहे. मात्र त्याच वेळी भाजपाप्रणित NDA च्या बैठकीत ३८ राजकीय पक्ष सहभागी होते, त्यामुळे NDA च्या तुलनेत I.N.D.I.A.चे बळ कमीच आहे. I.N.D.I.A. मध्ये कोणते राजकीय पक्ष आहेत जाणून घेऊया.

(हेही वाचा NDA : देशात स्थिर सरकार असेल तरच देश सक्षम होईल – नरेंद्र मोदी)

पक्षाचे नाव – स्वरूप – चिन्ह

  • कॅंाग्रेस – राष्ट्रीय पक्ष – हाताचा पंजा
  • टीएमसी – प्रादेशिक पक्ष – वर्तुळात फुलाचे झाड
  • डीएमके – प्रादेशिक पक्ष – उगवता सुर्य
  • आप –  प्रादेशिक पक्ष – झाडु
  • जेडी (यु) – प्रादेशिक पक्ष – बाण
  • आरजेडी – प्रादेशिक पक्ष – कंदील
  • जेएमएम –  प्रादेशिक पक्ष – धनुष्यबाण
  • राष्ट्रवादी कॅंाग्रेस पक्ष (शरद पवार) – प्रादेशिक पक्ष – घड्याळ
  • शिवसेना (उबाठा) –  प्रादेशिक पक्ष – मशाल
  • एसपी –  प्रादेशिक पक्ष – सायकल
  • एनसी –  प्रादेशिक पक्ष – निश्चित नाही
  • पीडीपी – प्रादेशिक पक्ष -शाईची दौत आणि पेन
  • सीपीआय (एम) – प्रादेशिक पक्ष – कोयता हातोडा
  • सीपीआय – प्रादेशिक पक्ष – कोयता आणि तृण
  • आरएलडी – प्रादेशिक पक्ष – हातपंप
  • एमडीएमके – प्रादेशिक पक्ष – भोवरा
  • केएमडीके – प्रादेशिक पक्ष – दोन झेंडे
  • व्हीसीके – प्रादेशिक पक्ष – चांदणी
  • आरएसपी –  प्रादेशिक पक्ष – फावडा
  • सीपीआय-एमएल – प्रादेशिक पक्ष – झेंड्यावर तीन चांदणी
  • फॅारव्हर्ड ब्लॅाक – प्रादेशिक पक्ष – वाघ
  • आययुएमएल – प्रादेशिक पक्ष – शिडी
  • केरला कॅंाग्रेस (जोसेफ) – प्रादेशिक पक्ष – वर्तुळात दोन पाने
  • केरला कॅंाग्रेस (मणी) – प्रादेशिक पक्ष –  निश्चित नाही
  • अपना दल – प्रादेशिक पक्ष – निश्चित नाही
  • मनीथानेया मक्कल कच्छी – प्रादेशिक पक्ष -झेंडा
Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.