Hindu Mahasabha आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लढवणार

71

आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी विविध राजकीय पक्षांकडून जय्यत तयारी सुरु झाली आहे. याच पार्श्वभूमीवर हिंदू महासभेची (Hindu Mahasabha) नुकतीच बैठक पार पडली. ही बैठक प्रदेशाध्यक्ष अॅड दत्ताजी सणस यांच्या आदेशाने जिल्हा कार्यलयात घेण्यात आली. या बैठीकीत आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लढविण्याचा निर्णय बहुमताने घेण्यात आला.

(हेही वाचा Operation Sindoor वरून रडगाणे गाताना पाकड्यांचा अमेरिकेत कबूलनामा; भारताकडून सर्व शक्तीनिशी हल्ला)

हिंदू महासभेची (Hindu Mahasabha) बैठक प्रदेशाध्यक्ष अॅड. गोविंद तिवारी यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आली. बैठकीत आगामी जिल्हा परिषद , पंचायत समिती व जळगाव महापलिकेची निवडणूक लढविण्याचा निर्णय घेण्यात आला. जिल्हा परिषद निवडणूक लढविण्यासाठी इच्छुक असणाऱ्यांनी हिंदू महासभेशी संपर्क साधला आहे. जळगाव महापालकेच्या निवडणुकीसाठी २० जणांचे नावे निश्चित करण्यात आली आहेत. हिंदू महासभेने (Hindu Mahasabha) जळगाव महापालिकेत हिंदुत्वनिष्ठ कार्यकर्त्यांना संधी दिली आहे. जळगाव महापालिका भ्रष्टाचाराचे आगार बनले असून भ्रष्टाचारमुक्त महापालिका होण्यासाठी अॅड. गोविंद तिवारी यांच्या मार्गदर्शनाखाली वाटचाल सुरु आहे. आगामी महापालिका निवडणुकीत हिंदू महासभा (Hindu Mahasabha) महत्त्वाची भूमिका बजावणार आहे. या बैठकीला जिल्हा अध्यक्ष विकास पाटील, अॅड. भूषण सूर्यवंशी, अँड. प्रितम पाटील, प्रकाश क्षीरसागर, डॉ. रमाकांत कदम, युवा अध्यक्ष मिलिंद नारखेडे, देविदास भंडगर आदी उपस्थित होते.

 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.