Himachal Pradesh : हिमाचलमध्ये सरकार पडण्याचा धोका; राज्यसभेच्या जागेसाठी क्रॉस व्होटिंगचा संशय

Himachal Pradesh : हिमाचलमधील मुख्यमंत्री सुखविंदर सिंग सुखू यांच्या नेतृत्वातील सरकार धोक्यात आले आहे. हिमाचलमध्ये 6 काँग्रेस आणि 3 अपक्ष आमदारांनी भाजपच्या बाजूने क्रॉस व्होटिंग केल्याचा संशय व्यक्त होत आहे.

129
Himachal Pradesh : हिमाचलमध्ये सरकार पडण्याचा धोका; राज्यसभेच्या जागेसाठी क्रॉस व्होटिंगचा संशय
Himachal Pradesh : हिमाचलमध्ये सरकार पडण्याचा धोका; राज्यसभेच्या जागेसाठी क्रॉस व्होटिंगचा संशय

हिमाचल प्रदेशमधील राज्यसभेच्या जागेसाठी मंगळवार, 27 फेब्रुवारी रोजी झालेल्या मतदानात काँग्रेस आमदारांनी प्रचंड क्रॉस व्होटिंग केल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. त्यामुळे हिमाचलमधील मुख्यमंत्री सुखविंदर सिंग सुखू (Sukhwinder Singh Sukhu) यांच्या नेतृत्वातील सरकार धोक्यात आले आहे. हिमाचलमध्ये 6 काँग्रेस आणि 3 अपक्ष आमदारांनी भाजपच्या बाजूने क्रॉस व्होटिंग केल्याचा संशय व्यक्त होत आहे. (Himachal Pradesh)

काँग्रेसचे (Congress) आमदार सुजानपूरचे राजेंद्र राणा, धर्मशालाचे सुधीर शर्मा, कुतलाहारचे देवेंद्र भुट्टो, बडसरचे आयडी लखनपाल, लाहौल-स्पितीचे रवी ठाकूर आणि गगरेटचे चैतन्य शर्मा यांची नावे पुढे येत आहेत. मतदानापूर्वी हे सर्व जण सकाळी एकाच वाहनातून विधानसभेत पोहोचले. विधानसभेच्या बाहेर भाजपचे आमदार बिक्रम ठाकूर आणि राकेश जामवाल यांनी त्यांची भेट घेतली. मतदानानंतर त्यांनी शिमला सोडले आणि आता कोणाच्याही संपर्कात नाही. यावरून काँग्रेस सरकारमध्ये खळबळ उडाली आहे.

हिमाचलमधील एक राज्यसभेची जागा भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा यांचा कार्यकाळ एप्रिलमध्ये पूर्ण होत असल्याने रिक्त होत आहे. येथे राज्यसभा निवडणूक जिंकण्यासाठी किमान 35 आमदारांची मते आवश्यक आहेत.

(हेही वाचा – Article 370 : ‘कलम 370’ चित्रपटाचा आखाती देशांना पोटशूळ)

मतमोजणीला भाजपचा विरोध

राज्यसभा (Rajya Sabha) निवडणुकीत सर्व 68 आमदारांनी मतदान केले आहे. मतमोजणी सुरू असताना भाजपने (BJP) विरोध केल्याने मतमोजणी तात्पुरती थांबवण्यात आली आहे. क्रॉस व्होटिंगचा संशय असलेले सर्व 9 आमदार पंचकुला येथे पोहोचले आहेत. हरियाणात सध्या भाजपचे सरकार आहे.

हमीरपूरचे तीन अपक्ष आमदार आशिष शर्मा, देहराचे होशियार सिंह आणि नालागढचे केएल ठाकूर यांनीही भाजपचे उमेदवार हर्ष महाजन यांना मत दिले आहे. या सर्व 9 आमदारांना CRPF सुरक्षा देण्यात आली आहे. यासाठी सीआरपीएफच्या 3 बस शिमला येथे दाखल झाल्या आहेत.

काँग्रेस आमदार नाराज

हिमाचल प्रदेशच्या विधानसभेत एकूण 68 जागा आहेत. नोव्हेंबर 2022 मध्ये विधानसभा निवडणुकीसाठी मतदान झाले आणि निवडणुकीचे निकाल 8 डिसेंबर 2022 रोजी आले. यामध्ये काँग्रेसला 40, तर भाजपला 25 जागा मिळाल्या आहेत. अपक्ष आमदारांनी 3 जागा जिंकल्या.

हिमाचल विधानसभा निवडणुकीत पक्षाला पूर्ण बहुमत मिळाल्यानंतर काँग्रेसने माजी मुख्यमंत्री स्व. वीरभद्र सिंग यांच्या गटाकडे दुर्लक्ष करून लोअर हिमाचलमधून आलेल्या सुखविंदर सिंग सुखू यांना मुख्यमंत्री केले. अवघ्या दीड वर्षात मुख्यमंत्र्यांच्या कार्यशैलीवर काँग्रेसचे अनेक आमदार नाराज असून त्यांनी उघडपणे मुख्यमंत्र्यांविरोधात आघाडी उघडली आहे. सुजानपूरचे आमदार राजेंद्र राणा आणि धर्मशालाचे आमदार सुधीर शर्मा स्वतःला मंत्री न केल्याने संतापले आहेत. दोघेही उघडपणे सरकार आणि मुख्यमंत्र्यांवर निशाणा साधत आहेत. (Himachal Pradesh)

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.