पाकिस्तान मागील अनेक दशके भारतामध्ये दहशतवादी कारवाया करत आहे. काश्मीरमध्ये हिंसाचार घडवत आहे, तेथील तरुणांची माथी भडकावून त्यांनी हिंसाचाराच्या मार्गावर आणत आहे. नुकतेच पहलगाम येथे पाकपुरस्कृत दहशतवाद्यांनी निरपराध, निःशस्त्र हिंदूंवर गोळ्या झाडून ठार केले. पाकिस्तानच्या या मानवीय कृत्यावर त्यांना एकदाचा धडा शिकवावा म्हणून भारताने अखेर ऑपरेशन सिंदूर राबवले आणि अमानवीय कृत्य करणाऱ्या हिंसाचारी दहशतवाद्यांची तळे उद्ध्वस्त केली. त्यावेळी पाकिस्तानच्या समर्थनार्थ तुर्की आणि अझरबैजान (Azerbaijan) हे दोन देश समोर आले आहे. त्यामुळे भारतीय पर्यटन कंपन्या आणि काही विमान कंपन्यांनी अझरबेजान यांच्यावर बहिष्कार टाकला आहे. विशेष म्हणजे अझरबैजान (Azerbaijan) इन्स्टिट्यूट फॉर डेमॉक्रॅसी अँड ह्युमन राईट्सचे प्रमुख डॉ. अहमद सैरोहग्लू यांनी X वर पोस्ट करत पाकिस्तानला अझरबैजान न्याय आणि बंधुताच्या आधारे पाठिंबा देत असल्याचे सांगत बहिष्कार टाकणाऱ्या भारतीय कंपन्याना धुडकावून लावले.
डॉ. अहमद सैरोहग्लू काय म्हणाले?
🇦🇿❤️🇵🇰
Those trying to intimidate us with threats and boycotts are making a huge mistake! Delhi must understand that #Azerbaijan has never abandoned the path of justice and brotherhood. The embargoes and travel bans called by Indian companies cannot shake our firm stance. We…— Dr. Ahmet Şairoğlu (@shahidovcom) May 13, 2025
धमक्या आणि बहिष्कार टाकून आपल्याला धमकावण्याचा प्रयत्न करणारे खूप मोठी चूक करत आहेत. दिल्लीने हे समजून घेतले पाहिजे की #अझरबैजानने कधीही न्याय आणि बंधुत्वाचा मार्ग सोडला नाही. भारतीय कंपन्यांनी पुकारलेले निर्बंध आणि प्रवास बंदी आमच्या ठाम भूमिकेला धक्का देऊ शकत नाहीत. आम्ही पाकिस्तानच्या बाजूने उभे आहोत – कारण हे बंधन आमच्या इतिहासाचा, आमच्या प्रतिष्ठेचा भाग आहे. बाकूने आधीच दिल्लीला स्पष्ट आणि ठाम संदेश पाठवला आहे: “जर कोणी दुःखी असेल तर त्यांनी जवळून पाहावे!” मुत्सद्देगिरी हे राजकारणाचे एक साधन असू शकते, परंतु मैत्री हा मानवतेचा सन्मान आहे. आम्ही धमक्या किंवा निर्बंधांवर आधारित मित्र निवडत नाही. आम्ही न्यायाच्या आणि जे योग्य आहे त्याच्या बाजूने उभे आहोत. कदाचित आर्थिक नुकसान होईल, परंतु सन्मान पैशात मोजला जात नाही! आम्ही विक्रीसाठी मित्र नाही किंवा दबावापुढे झुकण्याचे राष्ट्र नाही! अझरबैजान (Azerbaijan) #पाकिस्तानसोबत उभा आहे – आज, उद्या, नेहमीच!
दरम्यान पाकिस्तान हा कायम दहशतवादाला खतपाणी घालत असतो. भारतात दहशतवादी कृत्य घडवून आणून निरपराध लोकांचे प्राण घेण्यासाठी दहशतवाद्यांची फौज तयार करत आहे. त्यामुळे भारताने अखेर पाकिस्तानच्या दहशतवादी प्रवृत्तीच्या मुळावरच घाव घातला आहे. अशा वेळी भारताचे समर्थन करण्याऐवजी अझरबैजान (Azerbaijan) पाकिस्तानचा उदोउदो करत आहे, यावरून हा देशही दहशतवाद पुरस्कृत आहे, त्यामुळे आता भारतातील कंपन्या स्वतःहूनच या देशासोबत व्यापार संबंध तोडण्याच्या निर्णयात आहेत.
Join Our WhatsApp Community