भारतीय अर्थव्यवस्था ६ पटीने वाढणार?; केंद्रीय मंत्री Hardeep Singh Puri यांनी केला मोठा दावा

Hardeep Singh Puri : केंद्रीय पेट्रोलियम मंत्री हरदीप सिंग पुरी(Hardeep Singh Puri) यांनी अंदमान निकोबारमध्ये सुरू असलेले तेल उत्खननासंदर्भात महत्त्वाची माहिती दिली.

45

Hardeep Singh Puri : केंद्रीय पेट्रोलियम मंत्री हरदीप सिंग पुरी(Hardeep Singh Puri) यांनी अंदमान निकोबारमध्ये सुरू असलेले तेल उत्खननासंदर्भात महत्त्वाची माहिती दिली. केंद्रीय मंत्री पुरी(Hardeep Singh Puri) म्हणाले, अंदमानमध्ये सापडलेले तेलाचे साठ्यांचे प्रमाण गयाना राष्ट्राइतके मोठे असू शकतात. यामुळे भारतीय अर्थव्यवस्थेचा आवाका वाढण्याची शक्यता निर्माण झाली आहे. दरम्यान, केंद्रीय मंत्र्यांच्या विधानामुळे कच्च्या तेलाकरिता जागतिक बाजारपेठातील अवलंबित्व कमी होऊ शकेल.(Hardeep Singh Puri)

(हेही वाचा Iran-Israel War : ‘इराणचा अणुकार्यक्रम उद्ध्वस्त करायचाय, पण…’; लष्करी सामर्थ्य असणाऱ्या इस्त्रायलने अमेरिकेला आवाहन का केले? )

दरम्यान, केंद्र सरकारकडून अंदमान-निकोबार बेटानजीक सुरू असलेले तेल उत्खनन लवकरच पूर्णत्वास येईल. सरकारी तेल कंपन्यांकडून विदेशातून आयात होणाऱ्या कच्च्या तेल पुरवठ्यावरील अंवलंबित्व कमी करण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. आता तेल उत्खननासंदर्भात भाष्य करताना केंद्रीय मंत्री(Hardeep Singh Puri) म्हणाले, भविष्यात भारताकडे इतक्या प्रमाणात कच्चे तेल असेल की ते आपल्या गरजा पूर्ण करू शकेल व अन्य जागतिक बाजारपेठेत निर्यातही करता येईल.

(हेही वाचा ब्रिटेनमध्ये हिंदू असल्याच्या कारणावरून तरुणांना मारहाण; British Parliament मध्ये उठविला आवाज, पण…. )

केंद्रीय पेट्रोलियम व्यवहार मंत्री(Hardeep Singh Puri) यांच्या विधानानंतर कच्च्या तेलासंदर्भात नवीन शक्यता निर्माण झाल्या आहेत. गयानाच्या नागरिकांच्या उत्पन्नात चार पटीने वाढविणाऱ्या कच्च्या तेलाच्या साठ्याइतकेच साठे आता भारताच्या अंदमानमध्ये सापडण्याची अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे. ओएनजीसी, ओआयएल यांसारख्या सरकारी तेल कंपन्या अंदमान निकोबारमध्ये तेलाच्या उत्खननात गुंतल्या आहेत. ओएनजीसीने मे २०२४ मध्ये अंदमान भागात विहिरी खोदण्यास सुरुवात केली असून आतापर्यंत ५०० हून अधिक तेल विहिरी खोदल्या आहेत.

केंद्रीय मंत्री हरदीप सिंग पुरी काय म्हणाले?

द न्यू इंडियनला दिलेल्या मुलाखतीत बोलताना केंद्रीय पेट्रोलियम मंत्री हरदीप सिंग पुरी(Hardeep Singh Puri) यांनी म्हणाले की, अंदमान निकोबारमध्ये सुरू असलेले तेल उत्खनन लवकरच पूर्ण होऊ शकते. अंदमानमध्ये सापडलेले तेल साठे गयानाइतके मोठे असू शकतात, अशी शक्यता केंद्रीय मंत्री पुरी(Hardeep Singh Puri) यांनी वर्तविली. ते पुढे म्हणाले, आता परिस्थिती बदलत असून आम्हाला खूप विश्वास आहे की लवकर आणखी कच्च्या तेलाची क्षेत्रे सापडतील. अंदमान समुद्रात गयानासारखे मोठे तेल साठे सापडणे ही केवळ काळाची बाब आहे. यावर अजूनही काम सुरू असल्याचेही केंद्रीय पुरी यांनी सांगितले.(Hardeep Singh Puri)

 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.