Hardeep Singh Nijjar : खलिस्तानी दहशतवाद्याच्या हत्येच्या प्रकरणी कॅनडाचे भारतावर आरोप; भारत सरकारचे जोरदार प्रत्युत्तर

93
Hardeep Singh Nijjar : खलिस्तानी दहशतवाद्याच्या हत्येच्या प्रकरणी कॅनडाचे भारतावर आरोप; भारत सरकारचे जोरदार प्रत्युत्तर
Hardeep Singh Nijjar : खलिस्तानी दहशतवाद्याच्या हत्येच्या प्रकरणी कॅनडाचे भारतावर आरोप; भारत सरकारचे जोरदार प्रत्युत्तर

ब्रिटिश कोलंबियातील प्रमुख शीख नेते आणि खलिस्तानी दहशतवादी हरदीपसिंग निज्जरच्या हत्येप्रकरणी कॅनडाच्या सरकारने कारवाई करून एका भारतीय उच्चाधिकाऱ्याची हकालपट्टी केली आहे. (Hardeep Singh Nijjar) याबरोबर हरदीप सिंग निज्जर यांच्या हत्येमागे भारताचा हात असल्याचे आरोप कॅनडाचे पंतप्रधान जस्टिन ट्रूडो यांनी केले आहेत. कॅनडाच्या संसदेत निवेदन देताना कॅनडाचे पंतप्रधान जस्टिन ट्रूडो म्हणाले की, कॅनडाची तपासयंत्रणा भारत सरकारच्या सहभागाची चौकशी करत आहे. १८ सप्टेंबर रोजी कॅनडाच्या संसदेत चर्चेत बोलताना कॅनडाचे पंतप्रधान ट्रूडो यांनी दावा केला की, देशाच्या राष्ट्रीय सुरक्षा अधिकार्‍यांकडे विश्वास ठेवण्याची कारणे आहेत की “भारत सरकारच्या एजंटांनी” कॅनेडियन नागरिकाची हत्या केली, ज्यांनी अध्यक्ष म्हणूनही काम केले. कॅनडाच्या सुरक्षा यंत्रणा भारत सरकारचे एजंट आणि कॅनेडियन नागरिक हरदीप सिंग निज्जर यांच्या हत्येतील संभाव्य संबंधाच्या विश्वासार्ह आरोपांचा सक्रियपणे पाठपुरावा करत आहेत. कॅनडातील एका नागरिकाच्या हत्येमध्ये परकीय हात किंवा सरकारचा सहभाग अस्वीकारार्ह आहे.”

(हेही वाचा – Ganesh Festival : पंतप्रधानही म्हणतात, ‘गणपती बाप्पा मोरया’; गणेशोत्सवानिमित्त दिल्या मराठीतून शुभेच्छा !)

ट्रूडो सरकारचे आरोप निराधार – भारतीय परराष्ट्र मंत्रालय

भारतीय परराष्ट्र मंत्रालयाने कॅनडाच्या या कृतीवर जोरदार टीका केली आहे. परराष्ट्र मंत्रालयाने एका निवेदनात म्हटले आहे की, ट्रूडो सरकारचे आरोप निराधार, तर्कहीन आणि तथ्यांच्या पलीकडे आहेत. निज्जर यांच्या हत्येमध्ये भारताची कोणतीही भूमिका नाही. ट्रूडो यांनी १० सप्टेंबर रोजी झालेल्या बैठकीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर असेच आरोप केले होते आणि ते पूर्णपणे फेटाळले गेले. असे बिनबुडाचे आरोप खलिस्तानी दहशतवादी आणि कॅनडात अभय मिळालेल्या अतिरेक्यांकडून लक्ष वळवण्याचा प्रयत्न करतात. ते भारताच्या सार्वभौमत्वाला आणि प्रादेशिक अखंडतेला धोका निर्माण करत आहेत. या विषयावर कॅनडाच्या सरकारची निष्क्रियता ही दीर्घकाळापासून आणि सतत चिंतेची बाब आहे. आम्ही कॅनडा सरकारला त्यांच्या भूमीतून कार्यरत असलेल्या सर्व भारतविरोधी घटकांवर त्वरित आणि प्रभावी कायदेशीर कारवाई करण्याची विनंती करतो. (Hardeep Singh Nijjar)

कॅनडाचे परराष्ट्र मंत्री मेलानी जोली यांनी सांगितले की, त्यांनी कॅनडातील भारताच्या गुप्तचर संस्थेच्या प्रमुखाला देशाबाहेर काढून टाकले आहे. गेल्या आठवड्यात, कॅनडा आणि भारत यांच्या दरम्यान, मुक्त व्यापार करारावर स्वाक्षरी होणार होती. मात्र, जस्टीन ट्रूडो सरकारने याला स्थगिती दिली आहे.

ट्रूडो यांच्या आरोपांमुळे भारत आणि कॅनडाचे संबंध आता आणखी विकोपाला जाण्याची शक्यता आहे. जी 20 शिखर परिषदेच्या वेळी ट्रूडो यांच्याशी बोलताना पंतप्रधान मोदींनी ‘कॅनडा सरकार तेथील भूमीवर खलिस्तान समर्थक (हरदीप सिंग कॅनडा) घटकांशी सामना करण्यासाठी सहकार्य करेल’, अशी आशा व्यक्त केली होती.

ब्रिटीश कोलंबियातील सरे येथील गुरू नानक शीख गुरुद्वाराच्या पार्किंगमध्ये 18 जून रोजी कॅनेडियन नागरिक असलेला खलिस्तानी दहशतवादी निज्जरची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली होती. निज्जरला यापूर्वी भारत सरकारने खलिस्तान समर्थक कारवायांमध्ये सहभागी झाल्यामुळे दहशतवादी म्हणून घोषित केले होते. (Hardeep Singh Nijjar)

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.