अॅड. गुणरत्न सदावर्ते (Gunaratna Sadavarte) सध्या मराठवाडा दौऱ्यावर आहेत. या दौऱ्यात त्यांनी मराठा समाजाला ओबीसीमधून आरक्षणाची मागणी करणारे मनोज जरांगे पाटील यांच्यावर हल्लाबोल केला आहे. मनोज जरांगे यांच्यामुळेच मराठा समाजाचे आणि विद्यार्थ्यांचे नुकसान होत असल्याचा दावा करतानाच त्यांनी मराठा आरक्षणाचा नाद सोडावा, असा सल्ला सदावर्ते यांनी दिला आहे. (Gunaratna Sadavarte)
हेही वाचा-Jyoti Malhotra, प्रियंका सेनापतीनंतर ‘या’ नव्या युट्यूबरचा चेहरा वादाच्या भोवऱ्यात !
सदावर्ते (Gunaratna Sadavarte) म्हणाले, “मनोज जरांगे यांच्या हट्टामुळे मराठा विद्यार्थ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. आर्थिक दुर्बल घटक अंतर्गत मिळणारे आठ टक्के आरक्षण आता पाच टक्क्यांपेक्षा कमी मिळत आहे. इंजिनिअरिंग, वैद्यकीय शिक्षणासह एमपीएससी परीक्षार्थींच्या संधींवर याचा परिणाम झाला आहे. मनोज जरांगे यांनी आरक्षणाचा नाद सोडावा. आता जाणकार नेत्यांनी पुढे येऊन हा प्रश्न मार्गी लावायला हवा. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका जवळ आल्यामुळे जरांगे पुन्हा सक्रीय झाले आहेत.” (Gunaratna Sadavarte)
हेही वाचा- Jammu and Kashmir मध्ये दहशतवाद्यांच्या 2 साथीदारांना अटक ; शस्त्रे, ग्रेनेड आणि ४३ काडतुसे जप्त
“मनोज जरांगे म्हणजे जसे पावसाळ्यात अचानक छत्र्या उगवतात, तसेच निवडणुका जवळ आल्या की हे प्रकारचे लोक उगवत असतात. ते कुणासाठी तरी काम करत असतात. त्यांच्या मागे रेती माफिया, गुटखा माफिया आणि काही राजकीय पुढाऱ्यांचा आधार आहे. गेल्यावेळी मीच जरांगेंना मुंबईत येण्यापासून रोखले होते. त्यानंतर आता पुन्हा निवडणुका जवळ आल्यावर त्यांनी पुन्हा हालचाली सुरू केल्या आहेत. पण यावेळी त्यांच्या कायदेशीर मुसक्या आवळल्या जातील.” असा इशारा सदावर्तेंनी दिला आहे. (Gunaratna Sadavarte)
हेही पहा-
Join Our WhatsApp Community