गुढीपाडवा २०२३ : विविधरंगी संस्कृतीची समृद्धता दाखवणारा एक वारसा; राजकीय वर्तुळातील दिग्गजांकडून शुभेच्छा

85

यंदा मराठी नववर्ष अर्थात गुढीपाडवा राज्यभरात मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येत आहे. मुंबई-ठाण्यासह अनेक भागात शोभायात्रांचे आयोजन करण्यात आले आहे. ठाण्यातील गुढीपाडव्याच्या शोभायात्रेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे तर नागपूरात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस शोत्रायात्रेत सहभागी झाले आहेत. दरम्यान राजकीय वर्तुळातील दिग्गजांकडून मराठी नववर्षाच्या शुभेच्छा देण्यात आल्या आहेत.

राजकीय वर्तुळातील दिग्गजांकडून गुढीपाडव्याच्या शुभेच्छा!

सण विश्वासाचे प्रतीक आणि संस्कृतीचे वाहक – राष्ट्रपती

राष्ट्रपतींनी आपल्या संदेशात म्हटले आहे की, उगादी, गुढीपाडवा, चैत्र शुक्लादी, चेट्टी चंद, नवरोज आणि सजिबू चैरोबा या सणांच्या सर्व नागरिकांना शुभेच्छा देते. भारतीय नववर्षाचा आरंभ होताना साजरे होणारे हे सण पुरातन आपल्या विश्वासाचे प्रतीक आणि संस्कृतीचे वाहक आहेत. हे आनंद घेऊन येणारे उत्सव सामाजिक बंध आणि बंधुत्व दृढ करतात. या उत्सवांमधून आपण निसर्गाप्रती कृतज्ञता व्यक्त करतो, हे सण भारतातील वेगवेगळ्या समाजातील प्रेमाचे बंध घट्ट करोत तसेच सर्वांना सुसंवाद, आपुलकी , आनंद आणि समृद्धी प्रदान करोत अशा शुभेच्छा राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी दिल्या आहेत.

नवीन वर्ष आपल्याला आनंद, शांती आणि समृद्धी घेऊन येवो – उपराष्ट्रपती

देशात एकसमान आनंद आणि सहअस्तित्वाची भावना जागवणारा आपल्या पारंपारिक नववर्षाचा आरंभ भारतात वेगवेगळ्या नावांनी ओळखला जातो. हे प्रत्येक सण साजरे करण्याच्या पद्धती वेगवेगळ्या आहेत, पण आपल्या विविधरंगी संस्कृतीची समृद्धता दाखवणारा एक वारसा यातून दाखवता येतो. नवीन वर्ष आपल्याला आनंद, शांती आणि समृद्धी घेऊन येवो. अशा शुभेच्छा उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी दिल्या आहेत.

गृहमंत्री व संरक्षण मंत्र्यांकडून शुभेच्छा

नवीन वर्षाच्या आगमनाचा संदेश देणारा चैत्र शुक्ल प्रतिपदा आणि गुढीपाडवा हा सदैव वाईटावर चांगल्याच्या विजयाची प्रतिज्ञा घेऊन पुढे जाण्याचा संदेश देतो. गुढीपाडव्याच्या शुभमुहूर्तावर सर्वांना हार्दिक शुभेच्छा. हा सण सर्व देशवासियांच्या जीवनात समृद्धी घेऊन येवो ही प्रार्थना! असे मराठीमध्ये ट्वीट करत गृहमंत्री अमित शाहांनी महाराष्ट्राच्या जनतेला शुभेच्छा दिल्या आहेत. तसेच संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी सुद्धा ट्वीट करत शुभेच्छा दिल्या आहेत.

https://twitter.com/AmitShah/status/1638361618881888256

मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंकडून शुभेच्छा 

समृद्धीच्या संकल्पाला कर्तृत्वाची साथ हवी॥ विकास अन् विश्वासाची उंच उभारू गुढी नवी॥ गुढीपाडवा आणि नववर्षाच्या हार्दिक शुभेच्छा…अशा शुभेच्छा राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जनतेला दिल्या आहेत. तसेच ते नववर्षाच्या स्वागतासाठी ठाण्यातील शोभायात्रांमध्ये सबभागी झाले आहेत.

https://twitter.com/mieknathshinde/status/1638376801591492609

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडून शुभेच्छा

संपन्नतेची, समृध्दीची, समाजाच्या सर्वांगीण विकासाची, गुढी उभारुया…! गुढीपाडवा आणि हिंदू नववर्षाच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा! असे ट्वीट करत राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्राच्या जनतेला शुभेच्छा दिल्या आहेत. त्यांनी नागपूरात शोभायात्रेत हजेरी लावत नववर्षाचे स्वागत केले.

https://twitter.com/Dev_Fadnavis/status/1638367973021818881

मनातली सर्व स्वप्न पूर्ण होवोत – विरोधीपक्षनेते अजित पवार

वसंत ऋतुच्या आगमनासोबत साजरा होणारा गुढीपाडवा, येणारं नववर्ष,सर्वांच्या जीवनात सुख-समृद्धी, चैतन्य,उत्साह,आनंद, उत्तम आरोग्य घेऊन येवो. जीवनातल्या आशा-आकांक्षा, मनातली सर्व स्वप्नं पूर्ण होवोत. नवनिर्मितीच्या प्रयत्नांना चैत्रपालवीची संजीवनी मिळो. जीवनातली यशाची गुढी आभाळात उंच जावो. महाराष्ट्रवासीयांना, मराठीप्रेमी बांधवांना गुढीपाडवा आणि मराठी नववर्षाच्या शुभेच्छा! मावळत्या वर्षातील आनंददायी आठवणी सोबत घेऊन नववर्षाचं स्वागत करुया. एकजूट होऊन सुखी, समृद्ध, बलशाली महाराष्ट्र घडवूया! अशा शुभेच्छा महाराष्ट्राचे विरोधीपक्षनेते अजित पवार यांनी ट्विट करत दिल्या आहेत.

https://twitter.com/AjitPawarSpeaks/status/1638350922085552129

बळीराजावरील संकटं दूर होऊदे – शरद पवार

गुढीपाडव्याच्या शुभ दिनी नैराश्य दूर सारून नव्या आशा-आकांक्षांनी, सुखसमृद्धी व यशाने, निरोगी आरोग्याने आपले जीवन बहरू दे. या नव्या वर्षात बळीराजावरील संकटं दूर होऊन त्याच्या जीवनात स्थैर्य व सौख्याची पखरण होवो ही शुभकामना. सर्वांना गुढीपाडवाच्या हार्दिक शुभेच्छा! अशा शुभेच्छा राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी दिल्या आहेत.

https://twitter.com/PawarSpeaks/status/1638367394702716929

 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.