Chhagan Bhujbal : कुणबी प्रमाणपत्रे देणे थांबवा; छगन भुजबळांची मागणी

179
गरीब मराठा समाजाला वेगळे आरक्षण द्या पण आमच्यावर बुलडोझर चालवू नका, जे मराठा (Maratha) समाजाच्या सारथीला मिळाले ते ओबीसी, महाज्योतीलाही हवे, मराठा समाज मागास नाही, असे सर्वोच्च न्यायालयाने सांगितले, मग शिंदे समिती ताबडतोब बरखास्त करा, गेल्या २ महिन्यातील कुणबी प्रमाणपत्रांना स्थगिती द्या, निरगुडे आयोग, ओबीसी आयोग यांना काहीही आदेश असले तरी मराठा समाजाचे मागासलेलेपण सिद्ध करा, असे मंत्री छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) म्हणाले.

एकदाची जातीनिहाय जनगणना करा 

ओबीसी समाजाची हिंगोली येथे जाहीर सभा आयोजित करण्यात आली होती, तेव्हा मंत्री भुजबळ (Chhagan Bhujbal) बोलत होते. सर्वांचे सर्वेक्षण करा. एका समाजाचे सर्वेक्षण कसे होणार, कुठला समाज मागे आहे, कुठला समाज पुढे आहे याची तुलना झाली पाहिजे. सर्व जातीचे सर्वेक्षण करून कोण मागासलेले आहे आणि कोण पुढारलेले आहे. बिहारने जनगणना केली ६३ टक्के आढळले, भाजपा प्रदेशाध्यक्ष बावनकुळे, शरद पवार, अजित पवार, राहुल गांधी सगळेच सांगत आहेत, जनगणना करा. होऊ द्या जनगणना, मग कोणाची किती ताकद, लोकसंख्या किती हे कळेल. बिहार करू शकते तर महाराष्ट्र का करू शकत नाही. जे होईल ते मान्य करायला आम्ही तयार आहोत, असे भुजबळांनी म्हटले.

मराठा समाजाला वेगळे आरक्षण द्या 

आमचा मराठा  (Maratha) समाजाला विरोध नाही. त्यांना आरक्षण द्या पण वेगळे द्या. २ वेळा कायदा आला आम्ही समर्थन दिले. मराठा समाजाला विरोध नाही तर जाळपोळ करणाऱ्या झुंडशाहीला विरोध आहे. उपोषणकर्त्यासोबत राहणारा बेद्रेसह ३-४ जणांना पकडले. पोलिसांच्या एफआयआरनुसार, बेद्रेकडे पिस्तुलातील गोळ्या सापडल्या. उपोषणस्थळी ज्या पुंगळ्या सापडल्या त्या पिस्तुलच्या होत्या हे सुद्धा दाखवत आहेत. २४ तासात त्याला न्यायालयीन कोठडी मिळाली. ज्याच्यावर आरोप आहे हे त्यांनी केले. ७० पोलिसांना जखमी केले. त्याला चौकशीसाठीही ठेवणार नाही. एखाद्या पोलिसाला धक्का मारला तर ८ दिवस जेलमध्ये ठेवतील. पिस्तुल सापडले, गोळ्या झाडलेले सिद्ध झाले तरीही सोडले जाते असा आरोप भुजबळांनी (Chhagan Bhujbal) केला.
Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.