Santosh Deshmukh हत्या प्रकरणाच्या पहिल्याच सुनावणीत सरकारी वकील उज्ज्वल निकम, एसआयटी, सीआयडीचे अधिकारी गैरहजर

सुरक्षेच्या करणास्तव व्हिडिओ कॉन्फर्सिंगद्वारे आरोपींना न्यायालयासमोर ओळख परेडसाठी हजर करण्यात आले.

166
मस्साजोग ( ता. केज) येथील सरपंच संतोष देशमुख (Santosh Deshmukh) यांच्या हत्या प्रकरणाची पहिली सुनावणी केज येथील जिल्हा व अतिरिक्त सत्र न्यायालयाच्या मकोका अतिजलद न्यायालयात बुधवारी सकाळी झाली. यावेळी सरकारी वकील उज्ज्वल निकम, सीआयडी आणि एसआयटीचे अधिकारी गैरहजर होते. पुढील सुनावणीच्या वेळी हे सर्वजण उपस्थित राहणार असल्याचे समजते.
सुरक्षेच्या करणास्तव व्हिडिओ कॉन्फर्सिंगद्वारे आरोपींना न्यायालयासमोर ओळख परेडसाठी हजर करण्यात आले. यावेळी आरोपींच्या वकिलांनी जबाबचे पूर्ण कागदपत्रे मिळाले नाहीत, ते देण्यात यावे अशी मागणी केली. यानंतर आता या प्रकरणाची पुढील सुनावणी २६ मार्चला होणार असल्याचे न्यायाधीश सुधीर भाजीपाले यांनी सांगितले. केज तालुक्यातील मस्साजोग येथील सरपंच संतोष देशमुख (Santosh Deshmukh) यांचे ९ डिसेंबर २०२४ रोजी दुपारी अपहरण करुन त्यांची अतिशय क्रूरपणे हत्या करण्यात आली होती.
या प्रकारणाचा तपास सीआयडी आणि एसआयटीने करुन ८० दिवसांत बीडच्या मकोका न्यायालयात दोषारोप पत्र दाखल केले. मुख्य सूत्रधार वाल्मिक कराड पोलिसांना शरण आल्यापासून अॅड. अशोक कवडे व अॅड. सिद्धेश्वर ठोंबरे यांनी आतापर्यंत वाल्मिक कराडच्यावतीने न्यायालयीन कामकाज पाहिले होते. परंतु यावेळी कोल्हापूर येथील नामांकित विधिज्ञ अॅड. एस. एन. खाडे यांनी वाल्मिक कराडच्यावतीने सुनावणीत भाग घेतला. (Santosh Deshmukh)

 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.