गिरीश महाजनांनी सांगितली एकनाथ शिंदेंच्या बंडाची कहाणी; म्हणाले…

115

जळगावात एका जाहीर सभेत बोलताना भाजपचे नेते, मंत्री गिरीश महाजन यांनी महाराष्ट्रातील सत्तांतराचा किस्सा सांगितला. जेव्हा शिंदे यांनी अचानक उठावाला सुरुवात केली, तेव्हा आम्हाला विश्वास बसला नव्हता. पण एकनाथ शिंदे निघाले, ते पुढे गेले. त्यांच्यामागे काही लोक गेले आणि बघता बघता सगळे सैन्य त्यांच्या मागे गेले आणि एकदाचे झाले, असे महाजन म्हणाले.

ऑपरेशन फेल झाले, तर… 

या सर्व गोष्टी जमून आल्या. घडून आल्या. यासाठी चांमुंडा मातेचा आशीर्वाद आमच्यापाठी होता. हे सोप्प नव्हते. तुमच्या सर्वांचे आशीर्वाद होते. हे सोप्प आहे का एवढे? 40 लोक उद्धव ठाकरे यांना कंटाळून बाहेर पडत आहेत, हे सोप नव्हते, असेही महाजन म्हणाले. आम्हाला वाटले काही खरे नाही. मध्येच ऑपरेशन फेल झाले तर कसे व्हायचे? बरोबर आहे ना…? 40 लोक जमा करणे सोपे नव्हते. 17-18 लोक घेऊन निघायचे आणि 40 पर्यंत मजल गाठायची. 50 पर्यंत आपण गेलो. पण सोप नव्हते. पुढारी कसे असतात तुम्हाला माहीत आहे. पण सर्व एकनाथ शिंदे साहेब यांच्यासोबत राहीले, असेही गिरीश महाजन म्हणाले. 

(हेही वाचा गुलाबराव पाटील गुवाहाटीला कसे पोहचले? मुख्यमंत्र्यांनी सांगितला ‘तो’ किस्सा)

मुख्यमंत्री दिवस-रात्र काम करतात 

बुडायला लागलो तर समुद्राची लाट येते आणि ढकलून देते. अशीच लाट आली. ही लाट साधीसुधी नव्हती. तर लाट आली आणि थेट शिंदे यांना मुख्यमंत्रीपदाच्या खुर्चीवरच बसवून दिले. आता आपले सरकार आहे. गेल्या सहा सात महिन्यांपासून राज्यात काम सुरू आहे. आम्ही म्हणतोय चार तास तरी झोपा. पण ते रात्री 3 वाजेपर्यंत काम करतात. अडीच वर्षापूर्वीचा काळ पाहा. तेव्हाचे मुख्यमंत्री घराच्या पायरीतून निघत नव्हते. कॉम्प्युटरवरून काम करत होते. आपले मुख्यमंत्री मात्र उशिरा उशिरापर्यंत जागून काम करतात. हेच खरे जाणता राजा आहेत, असेही गिरीश महाजन म्हणाले. 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.