Pahalgam Terror Attack : “जणूकाही दहशतवादी तुम्हालाच विचारून …” ; Girish Mahajan यांनी शरद पवारांना सुनावले

Pahalgam Terror Attack : "जणूकाही दहशतवादी तुम्हालाच विचारून ..." ; Girish Mahajan यांनी शरद पवारांना सुनावले

87
Pahalgam Terror Attack :
Pahalgam Terror Attack : "जणूकाही दहशतवादी तुम्हालाच विचारून ..." ; Girish Mahajan यांनी शरद पवारांना सुनावले

पहलगाममध्ये (Pahalgam Terror Attack) झालेल्या भ्याड हल्ल्यावर प्रतिक्रिया देताना राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी “हिंदू आहेत म्हणून दहशतवाद्यांनी पर्यटकांना गोळ्या घातल्या असं म्हणतात. पण यात काय सत्य आहे याची मला माहिती नाही”, असे वक्तव्य केले. त्यानंतर आता या वक्तव्यावर भाजपचे मंत्री गिरीश महाजन यांनी शरद पवारांना सुनावले आहे. (Pahalgam Terror Attack)

जम्मू काश्मीर येथील पहलगाम येथील बैसरन खोऱ्यात गेल्या दहशतवाद्यांनी भ्याड हल्ला केला. या हल्ल्यात २६ जणांना आपला प्राण गमवावा लागला. या हल्ल्यानंतर सुखरूप घरी परतलेल्या पर्यटकांनी माध्यमांशी संवाद साधताना जेव्हा आपबिती सांगितली तेव्हा अशी माहिती समोर आली की, दहशतवाद्यांनी मारण्यापूर्णी नाव आणि धर्म विचारला त्यानंतर गोळ्या झाडल्या. (Pahalgam Terror Attack)

गिरीश महाजन काय म्हणाले ?
या प्रकरणावर शरद पवारांना प्रत्त्युत्तर देताना गिरीश महाजन म्हणाले, तुम्हाला इतरांचं दुख जाणवत नसेल तरी ठीक आहे, पण आपल्या “व्होट जिहाद” साठी इतरांच्या दुःखाला खोटं ठरवण्याचा तुम्हाला अधिकार नाही. पहलगाम येथे झालेला रक्तपात हा केवळ दहशतवादी हल्ला नाही.. या हल्ल्यात पुरुषांना मारून महिलांना आयुष्यभर मरणयातना भोगण्यासाठी जिवंत ठेवण्यात आलं. केवळ हिंदूंना टिपून, धर्म विचारून केलेला हा धार्मिक नरसंहार आहे. ज्यांनी डोळ्यादेखत आपला मुलगा गमावला, भाऊ गमावला, पती गमावला, बाप गमावला ते प्रत्यक्षदर्शी सांगताय काय अतिरेक्यांनी धर्म विचारून जीव घेतला. अन् तुम्ही हजारो मैल दूर बसून त्या सर्वांना खोटं ठरवताय ? “दहशतवाद्यांनी कोणाला धर्म विचारला नाही” हे तुम्ही इतक्या आत्मविश्वासाने सांगताय काय जणूकाही ते दहशतवादी तुम्हालाच विचारून सगळं करत होते..! आपलं वय पाहता आपला अपमान न करणे हे संस्कारांनी आमच्यावर घातलेलं बंधन आहे, अन्यथा आपल्या या वक्तव्याचा निषेध करण्यासाठी शब्द अपुरे आहेत ! (Pahalgam Terror Attack)

शरद पवार काय म्हणाले होते?
शरद पवार म्हणाले की, “हिंदू आहेत म्हणून दहशतवाद्यांनी पर्यटकांना गोळ्या घातल्या असं म्हणतात. पण यात काय सत्य आहे याची मला माहिती नाही. पण तिथं जे लोक होते त्यातल्या स्त्रियांना सोडलं आहे. मी एका भगिनीच्या घरी गेलो होतो. त्यावेळी त्यांनी सांगितले आम्हा महिलांना हात लावले नाही. त्यांनी फक्त आमच्या पुरुषांना हात लावला.” (Pahalgam Terror Attack)

हेही पहा-

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.