इटलीच्या पंतप्रधान जॉर्जियो मेलोनी यांनी गुरुवारी रात्री पंतप्रधान मोदींशी फोनवरून संवाद साधला. मंगळवारी जम्मू आणि काश्मीरमधील पहलगाम (Pahalgam Terror Attack) येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यात मृत्युमुखी पडलेल्या लोकांबद्दल त्यांनी शोक व्यक्त केला. दहशतवादाविरुद्धच्या लढाईत इटलीचा पूर्ण पाठिंबा असल्याचा पुनरुच्चार त्यांनी केला. (Pahalgam Terror Attack)
पंतप्रधान मोदींनी त्यांच्या पाठिंब्याचे आणि दहशतवादाविरुद्धच्या स्पष्ट संदेशाचे कौतुक केले. मेलोनींव्यतिरिक्त, फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन यांनीही पंतप्रधान मोदींशी फोनवरून चर्चा केली. पहलगाम हल्ल्यात मृत्युमुखी पडलेल्या लोकांबद्दल शोक व्यक्त करताना त्यांनी सांगितले की, फ्रान्स आणि त्यांचे मित्र राष्ट्रे जिथे गरज पडेल तिथे दहशतवादाविरुद्ध लढत राहतील. मॅक्रॉन यांनी पंतप्रधान मोदींसोबतच्या त्यांच्या X वरच्या संभाषणाचा तपशील हिंदीमध्ये पोस्ट केला. (Pahalgam Terror Attack)
मैंने अभी-अभी अपने समकक्ष @narendramodi से मंगलवार को हुए कायरतापूर्ण आतंकवादी हमले पर बात की, जिसमें दर्जनों निर्दोष नागरिकों की दुखद मृत्यु हुई है।
इस शोक की घड़ी में फ़्रांस भारत और उसके लोगों के साथ दृढ़ता से खड़ा है।
फ़्रांस, अपने सहयोगियों के साथ मिलकर, आतंकवाद के विरुद्ध…
— Emmanuel Macron (@EmmanuelMacron) April 24, 2025
जम्मू आणि काश्मीरमधील पहलगाम येथील दहशतवादी हल्ल्याचा मुद्दा ब्रिटिश संसदेतही गाजला. तनमनजीत सिंग धेसी आणि ब्रिटिश खासदार बॉब ब्लॅकमन यांनी गुरुवारी (२४ एप्रिल) संसदेत हा मुद्दा उपस्थित केला आणि त्याला भ्याड, भयानक आणि धक्कादायक दहशतवादी हल्ला असल्याचं म्हटलं. (Pahalgam Terror Attack)
हेही पहा-
Join Our WhatsApp Community