Same Sex Marriage : न्यायालयाचा हा अवमान नाही का?, दिल्लीतील वकिलांच्या वर्तनावर संमिश्र प्रतिक्रिया

सर्वोच्च न्यायालयाने समलैंगिक विवाहाला कायदेशीर मान्यता देण्यास नकार दिला आहे.

74
Same Sex Marriage : न्यायालयाचा हा अवमान नाही का?, दिल्लीतील वकिलांच्या वर्तनावर संमिश्र प्रतिक्रिया
Same Sex Marriage : न्यायालयाचा हा अवमान नाही का?, दिल्लीतील वकिलांच्या वर्तनावर संमिश्र प्रतिक्रिया

सर्वोच्च न्यायालयाने समलैंगिक विवाहाला कायदेशीर मान्यता देण्यास नकार दिला आहे. त्यानंतर सर्वोच्च न्यायालयाचे वकिल अधिवक्ता उत्कर्ष सक्सेना यांनी अधिवक्ता अनय कोटिया यांना न्यायालयाच्या परिसरातच प्रपोज केले. या घटनेने संपूर्ण देशाचे लक्ष वेधले आहे. परंतु, समलिंगी वकिलांनी प्रपोज करणे म्हणजे न्यायालयाचा अवमान नव्हे काय? असा प्रश्न विचारल्यास दिल्लीतील कायदेतज्ज्ञांनी संमिश्र प्रतिक्रिया व्यक्त केली. सर्वोच्च न्यायालयाने मंगळवारी समलिंगी विवाहाला कायदेशीर मान्यता देण्यास नकार दिला आहे. मुळात, समलिंगी विवाहाबाबत सर्वंकष विचार करून कायदा बनविण्याचे काम संसदेचे आहे, असे न्यायालयाने म्हटले आहे. न्यायालयाच्या निकालानंतरही सर्वोच्च न्यायालयात कार्यरत दोन वकिलांनी न्यायालयाच्या परिसरातच एकमेकांना लग्नासाठी प्रपोज केले. (Same Sex Marriage)

याबाबत बोलताना अधिवक्ता सत्यजीत देसाई म्हणाले की, एका पुरूष वकिलाने दुसऱ्या पुरूष वकिलाला लग्नासाठी प्रपोज केले आहे. ही घटना न्यायालयाच्या निकालानंतर घडली असली तरी ती न्यायालयाचा अवमान करणारी घटना नाही. कारण, न्यायालयाने निकालात स्पष्ट केले आहे की, समलिंगी विवाहाला कायदेशीर मान्यता देता येणार नाही. दोन्ही वकिल सोबत राहत असतील किंवा दोघांनी लग्न केले तरी तो त्यांचा वैयक्तिक निर्णय आहे. परंतु, त्यास कायदेशीर मान्यता नसेल. यानंतर ते सोबत राहण्याचा निर्णय घेत असतील तर तो त्यांचा वैयक्तिक निर्णय आहे, असे देसाई म्हणाले. (Same Sex Marriage)

(हेही वाचा – Sugarcane Crushing Season : राज्यात यंदा ‘इतकी’ साखर तयार होणार; १ नोव्हेंबरपासून सुरु होणार ऊस गाळप हंगाम)

अधिवक्ता जयश्री सातपुते म्हणाल्या की, न्यायालयाने समलिंगी विवाहाला कायदेशीर मान्यता नाकारली आहे. असे असले तरी दस्तुरखुद्य न्यायालयानेच जोडीदार निवडण्याचे प्रत्येकाला स्वातंत्र्य असल्याचे म्हटले आहे. जोडीदार निवडण्यावर त्यांनी कोणत्याही प्रकारचे बंधन लादलेले नाही. तरीसुध्दा, निकालाचा अभ्यास केल्यानंतरच याबाबत विस्तृत बोलणे बरे होईल, असेही त्या म्हणाल्या. न्यायालयाचा निकाल आल्यानंतर अ‍ॅड. उत्कर्ष सक्सेना यांनी न्यायालयाच्या परिसरात गुडघ्यावर बसून जोडीदार अ‍ॅड. अनय कोटिया यांच्यापुढे रिंग पुढे करीत प्रपोज केले होते. आजचा दिवस आमच्या पराभवाचा नसून साखरपुड्याचा आहे, अशी प्रतिक्रिया त्यांनी व्यक्त केली होती. (Same Sex Marriage)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.