Smriti Irani : गांधी कुटुंबाने हडपली अमेठी वासियांची जमीन; स्मृती इराणी यांचा आरोप

अमेठीतील शेतकऱ्यांची फसवणूक आणि औद्योगिकीकरणाच्या नावाखाली त्यांच्या जमिनी गांधी कुटुंबाने हडप केल्या, असा गंभीर आरोप स्मृती इराणी यांनी केला आहे.

140
Smriti Irani : गांधी कुटुंबाने हडपली अमेठी वासियांची जमीन; स्मृती इराणी यांचा आरोप
Smriti Irani : गांधी कुटुंबाने हडपली अमेठी वासियांची जमीन; स्मृती इराणी यांचा आरोप

देशहिताच्या मोठ मोठ्या गप्पा मारणाऱ्या गांधी कुटुंबाचा खरा चेहरा पुढे आला आहे. अमेठीमधील शेतकऱ्यांची शेकडो एकर जमीन गांधी कुटुंबाने स्वतःच्या ताब्यात घेतली असल्याचा आरोप त्यांच्यावर करण्यात आला आहे. केंद्रीय मंत्री स्मृती इराणी (Smriti Irani) यांनी गांधी कुटुंबावर शेतकऱ्यांची जमिनी हडपल्याचा गंभीर आरोप केला आहे. (Smriti Irani)

अमेठीतील शेतकऱ्यांची फसवणूक आणि औद्योगिकीकरणाच्या नावाखाली त्यांच्या जमिनी गांधी कुटुंबाने हडप केल्या, असा गंभीर आरोप त्यांनी केला आहे. त्या म्हणाल्या. गांधी कुटुंबाने तेथील औद्योगिकीकरणाचे स्वप्न दाखवून शेतकऱ्यांची ३० एकर जमीन अवघ्या ६०० रुपये भाड्याने बळकावली आहे. एएनआय या वृत्तसंस्थेच्या स्मिता प्रकाश यांना दिलेल्या पॉडकास्टमध्ये इराणी (Smriti Irani) यांनी हा खळबळजनक आरोप केला आहे. (Smriti Irani)

(हेही वाचा – Nitin Gadkari : केंद्रीय मंत्री नितीन गडकरी म्हणतात, ‘ब्राह्मणांना कोणतेही आरक्षण नाही हे परमेश्वराचे उपकार’)

स्मृती इराणी (Smriti Irani) म्हणाल्या, ‘लोकांना हे समजावून सांगायला मला थोडा वेळ लागला, पण प्रत्यक्षात अमेठीतील लोकांच्या जमिनी गांधी घराण्याने हडप केल्या आहेत. मी संसदेतही ही गोष्ट सांगितली आहे. ३० एकर जमीन ६०० रुपयांना भाड्याने दिली आहे. पण गांधी परिवाराने तिथे स्वतःसाठी एक प्रशस्त कॉम्प्लेक्स बांधले आहे. औद्योगिकीकरणाच्या नावाखाली तेथे जमिनी घेतल्या आहेत,’ असा आरोप इराणी (Smriti Irani) यांनी केला. अमेठी हा गांधी घराण्याचा बालेकिल्ला. २०१४ च्या लोकसभा निवडणुकीत स्मृती इराणी (Smriti Irani) यांनी याच मतदारसंघातून राहुल गांधींना (Rahul Gandhi) आव्हान देण्याचा प्रयत्न केला. पण त्यांचा पराभव झाला. मात्र, या पराभवाचे उट्टे त्यांनी २०१९ मध्ये काढले. त्यांनी राहुल गांधींचा (Rahul Gandhi) पराभव करत अमेठी जिंकली. ४७ वर्षीय स्मृती इराणी (Smriti Irani) या पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) मंत्रिमंडळातील सर्वात कमी वयाच्या मंत्री आहेत. (Smriti Irani)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.