G-20 Summit : G20 चे नेते आणि त्यांच्या पत्नी यांच्यासाठी भारतीय कलेचे दर्शन घडवणाऱ्या वस्तूंचे प्रदर्शन !

88
G-20 Summit : G20 चे नेते आणि त्यांच्या पत्नी यांच्यासाठी भारतीय कलेचे दर्शन घडवणाऱ्या वस्तूंचे प्रदर्शन !
G-20 Summit : G20 चे नेते आणि त्यांच्या पत्नी यांच्यासाठी भारतीय कलेचे दर्शन घडवणाऱ्या वस्तूंचे प्रदर्शन !

९ आणि १० सप्टेंबर रोजी होणाऱ्या G20 परिषदेत (G-20 Summit) अमेरिकेचे अध्यक्ष जो बिडेन, फ्रान्सचे अध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन, ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान अँथनी अल्बानीज, जर्मनीचे चांसलर ओलाफ स्कोल्झ, ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक आणि जपानचे पंतप्रधान फुमियो किशिदा यांच्यासह अनेक नेते सहभागी होणार आहेत. एनजीएमएमध्ये भारतातील विविध राज्यांमधील कला एकत्रित करून साकारलेल्या वस्तू या प्रदर्शनात ठेवण्यात आल्या आहेत. G20 शिखर परिषदेत सहभागी होणाऱ्या या नेत्यांसाठी नॅशनल गॅलरी ऑफ मॉडर्न आर्ट (NGMA) येथे भारताच्या समृद्ध परंपरेचे दर्शन घडवणाऱ्या अनेक वस्तूंचे प्रदर्शन आयोजित करण्यात आले आहे. या प्रदर्शनात महिलांसाठी सलवार सूट, मातीची भांडी आणि दागिने ठेवण्यात आले आहेत.विविध देशांच्या प्रथम नागरिक यांना या वस्तू खरेदी करता येणार आहेत. (G-20 Summit)

(हेही वाचा – Road Site Open Drain : रोड साईट ओपन ड्रेन : आरटीओची नोंदणी संपणाऱ्या मशिन्सच्या देखभालीत कंत्राटदाराचे भले)

या ‘सभ्यतावादी पराक्रम आणि कलात्मकते’ला समर्पित असलेल्या ‘रूट्स अँड रूट्स: पास्ट प्रेझेंट अँड कंटिन्युअस’ प्रदर्शनाचे उद्घाटन करण्यासाठी G20 नेत्यांच्या पत्नी ९ सप्टेंबर रोजी दिल्ली येथील नॅशनल गॅलरी ऑफ मॉडर्न आर्टला भेट देतील. (G-20 Summit)

प्रदर्शनात भारतीय कलेला प्रोत्साहन

१. भारताच्या हस्तकलेचे प्रतीक असणाऱ्या हाताने पेंटिंग केलेली पश्मिना शाल, कोलकाता येथून आलेल्या भरतकाम केलेल्या वस्तू या प्रदर्शनात ठेवण्यात आल्या आहेत. यातील सर्वात महाग पश्मिना साडीची किंमत आठ लाख रुपये आहे.

२. प्रदर्शनातील एका सलवार सूटची किंमत २.५ लाख आहे. त्याचप्रमाणे नटराजाची मूर्ती  6,000 डाॅलर (रु. ४.९८ लाख) किमतीची आहे.

३. गुजरातच्या पाटण प्रदेशातून पारंपारिकपणे डबल इरकत विणण्याच्या तंत्राचा वापर करून बनवलेल्या पाटण पटोला साड्याही प्रदर्शनात आहेत.

४. एनजीएमएमध्ये साडीचा स्टॉल लावणाऱ्या सुनील सोनी यांनी सांगितले की, १.३५ लाखापासून ते ३.५ लाखांपर्यंत जाणाऱ्या विंटेज पटोला साड्या या ९०० वर्षांपासून सुरु असलेल्या पारंपरिक विणकाम कलेचा नमुना आहेत. एक पाटणा पटोला साडी बनवायला साधारण साडेसात महिने लागतात. (G-20 Summit)

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.