France मध्ये मुस्लिम विरोधी पक्षाला सत्तेपासून दूर ठेवायला इतर पक्षांनी केली आघाडी

245

ज्याप्रमाणे भारतात लोकसभा निवडणुकीत उत्तर प्रदेशात काँग्रेस आणि समाजवादी पक्ष एकत्र आल्यामुळे भाजापाचे नुकसान झाले, हाच फॉर्म्युला आता फ्रान्समधील (France) पक्षांनी स्वीकारला आहे. या ठिकाणी मुस्लिम विरोधी पक्षाला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी या पक्षाच्या विरोधातील दोन पक्ष एकत्र आले आहेत. ज्यामुळे मुस्लिम विरोधी पक्ष तिसऱ्या स्थानावर गेला आहे.

नॅशनल रॅली पक्षाला १४३ मिळाल्या

सोमवारी फ्रान्समधील (France) निवडणुकीचे निकाल जाहीर झाले आहेत. यामध्ये विजयाचा दावेदार मानला जात असलेल्या नॅशनल रॅली या पक्षाला १४३ जागांसह तिसऱ्या स्थानावर समाधान मानावे लागले. आठवडाभरापूर्वीपर्यंत या पक्षाला ३०० पेक्षा अधिक जागा मिळतील, असा अंदाज वर्तवला जात होता. मात्र प्रत्यक्षात संसदेतील निकाल हे त्रिशंकू लागले. ३० जून रोजी फ्रान्समध्ये पहिल्या टप्प्यातील निवडणूक झाली होती. त्या निवडणुकीत नॅशनल रॅली पक्ष मोठ्या विजयाच्या दिशेने आगेकूच करताना दिसत होता. अशा परिस्थितीत त्यांना मिळत असलेली आघाडी पाहून विरोधी पक्ष गडबडले. या पक्षांमध्ये राष्ट्रपती इमॅन्युअल मॅक्राँ यांच्या पक्षाचा आणि डाव्या पक्षांचा समावेश होता. पहिल्या टप्प्यातील निवडणुकीनंतर डाव्या पक्षांनी सगळा विरोध विसरून एक नवे अँटी नॅशलन रॅली आघाडी बनवली. मॅक्राँ यांचे समर्थक आणि डाव्या पक्षांनीही आपापसातील मतभेद मिटवले आणि ते एकजूट होऊन मैदानात उतरले. दुसरीकडे कट्टरतावादी पक्षाला रोखण्यासाठी उदारमतवादी मतदार मोठ्या संख्येने मतदान देण्यासाठी उतरले. त्यानंतर एका आठवडाभरात संपूर्ण निवडणुकीचे चित्र बदलले. तसेच नॅशनल रॅलीविरोधात मतदारांचे ऐक्य झाले.

(हेही वाचा Rahul Gandhi : गांधी घराण्याच्या वंशजाची बालकबुद्धी!)

बहुमतासाठी किमान २८९ जागांची आवश्यकता

नॅशनल रॅलीविरोधात होणारे मतांचे विभाजन टळले. तसेच नॅशनल रॅलीविरोधात मतांची एकजूट झाली आणि पक्षाला पराभव पत्करावा लागला. मात्र नॅशनल रॅली हा फ्रान्सच्या (France) संसदेतील सर्वात मोठा पक्ष ठरला आहे. त्यांना १४३ जागा मिळाल्या. मात्र आघाड्यांचा विचार केला असता ते तिसऱ्या क्रमांकावर राहिले. अँटी मुस्लिम पक्ष नॅशनल रॅलीला रोखण्यासाठी डाव्या आणि मध्यममार्गी पक्षांनी न्यू पॉप्युलर फ्रंट उभी केली होती. त्यांना सर्वाधिक १८२ जागा मिळाल्या. मॅक्राँ यांच्या एनसेंबल आघाडीला १६८ जागा मिळाल्या. ही आघाडी दुसऱ्या क्रमांकावर राहिली. नॅशनल रॅली पक्ष तिसऱ्या क्रमांकावर राहिला. त्यांना १४३ जागा मिळाल्या. फ्रान्सच्या नॅशनल असेंब्लीमध्ये ५७७ जागा आहेत. तसेच बहुमतासाठी किमान २८९ जागांची आवश्यकता आहे. अशा परिस्थितीत एनएफपी आणि एनसेंबल अलायन्स हे एकत्र येऊन सरकार स्थापन करतील, अशी शक्यता वर्तवली जात आहे.

 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.