माजी आमदार Rahul Jagtap यांचा अजित पवार गटात प्रवेश

55
माजी आमदार Rahul Jagtap यांचा अजित पवार गटात प्रवेश
  • प्रतिनिधी

श्रीगोंदा विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार राहुल जगताप (Rahul Jagtap) तसेच श्रीगोंदा सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष राजेंद्र नागवडे यांनी मंगळवारी आपल्या शेकडो समर्थक कार्यकर्त्यांसह उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला. प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्या उपस्थितीत प्रवेश झाला. जगताप यांच्या पक्षप्रवेशाने श्रीगोंदा तालुक्यात शरद पवार गटाला मोठा धक्का बसला आहे.

(हेही वाचा – Veer Savarkar : भगूर येथील सावरकर स्मारकात विविध मान्यवरांनी केले अभिवादन)

राहुल जगताप (Rahul Jagtap) हे २०१४ च्या विधानसभा निवडणुकीत श्रीगोंदा मतदारसंघातून राष्ट्रवादीच्या चिन्हावर निवडून गेले होते. २०२९ च्या विधानसभा निवडणुकीत त्यांना उमेदवारी नाकारण्यात आली होती. राहुल जगताप यांनी २०२४ ची विधानसभा निवडणूक अपक्ष म्हणून लढवली. मात्र, त्यांना भाजपाच्या विक्रम पाचपुते यांच्याकडून पराभव पत्करावा लागला होता. या पार्श्वभूमीवर राहुल जगताप यांनी बुधवारी शरद पवार यांची साथ सोडून अजित पवार यांना समर्थन देण्याचा निर्णय घेतला.

(हेही वाचा – Corona च्या नव्या सब व्हेरिअंटमुळे अमेरिकेत एका आठवड्यात 350 जणांचा मृत्यू)

राजेंद्र नागवडे यांनीही बुधवारी आपल्या कार्यकर्त्यांसह राष्ट्रवादीत प्रवेश केला. राजेंद्र यांच्या पत्नी अनुराधा नागवडे यांनी २०२४ ची निवडणूक शिवसेना उबाठाच्या चिन्हावर लढवली होती. मात्र, या निवडणुकीत त्यांचा पराभव झाला होता. दरम्यान, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत श्रीगोंदा येथे लवकरच पक्षाची भव्य जाहीर सभा घेतली जाईल, असे सुनील तटकरे यांनी यावेळी जाहीर केले. पक्ष प्रवेशावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे कोषाध्यक्ष आमदार शिवाजीराव गर्जे, मुख्य प्रवक्ते आनंद परांजपे, प्रदेश प्रवक्ते संजय तटकरे, युवक प्रदेशाध्यक्ष सूरज चव्हाण, प्रदेश सरचिटणीस लतिफ तांबोळी, जिल्हाध्यक्ष अशोक सावंत उपस्थित होते.

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.