-
प्रतिनिधी
सोलापूर जिल्ह्यातील करमाळा विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार जयंतराव जगताप यांनी मंगळवारी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेत (Shiv Sena) प्रवेश केला. भाजपामध्ये काँग्रेस व राष्ट्रवादीचे अनेक नेते सामील होत असताना, शिवसेनेत झालेला हा प्रवेश विशेषतः पश्चिम महाराष्ट्राच्या राजकारणासाठी निर्णायक मानला जात आहे. जयंतराव जगताप यांनी 1990 मध्ये अपक्ष म्हणून विधानसभेत प्रवेश केला होता आणि 2004 मध्ये शिवसेनेच्या तिकिटावर विजय मिळवून विधानसभा गाठली होती. त्यांचा राजकीय अनुभव आणि करमाळा परिसरातील मजबूत जनाधार यामुळे शिवसेनेला सोलापूर जिल्ह्यात मोठे राजकीय बळ मिळाले आहे.
(हेही वाचा – Mumbra Train Accident : इच्छा तेथे मार्ग हाच रेल्वे समस्येवर एकमात्र उपाय)
प्रवेशावेळी उपस्थित दिग्गज नेते
जगताप यांच्या पक्षप्रवेशाच्या कार्यक्रमास माजी आमदार शहाजीबापू पाटील, डॉ. शशिकांत खेडकर, शिवसेना वैद्यकीय कक्षाचे प्रमुख मंगेश चिवटे, तसेच करमाळा-माढा जिल्हाप्रमुख महेश चिवटे यांची उपस्थिती होती. हा प्रवेश औपचारिक नसून, राजकीय रणनीतीचा एक महत्त्वाचा टप्पा असल्याचे विश्लेषकांचे मत आहे.
(हेही वाचा – China Thanks Indian Navy ;’या’ कारणासाठी चीनने भारताचे मानले आभार)
शिवसेनेच्या वाढत्या ताकदीचा पुरावा
या प्रवेशामुळे करमाळा, माढा आणि संपूर्ण सोलापूर जिल्ह्यात शिवसेनेचा (Shiv Sena) प्रभाव वाढणार असून, आगामी निवडणुकांपूर्वी पश्चिम महाराष्ट्रातील मतदारांवर प्रभाव टाकण्यासाठी हा ‘पॉवर मूव्ह’ ठरेल, असा विश्वास शिंदे समर्थकांमध्ये व्यक्त होत आहे. जयंतराव जगताप यांचा शिवसेनेत प्रवेश म्हणजे सोलापूरच्या राजकारणात नवा टप्पा. शिवसेनेसाठी हा फक्त एक पक्षप्रवेश नसून, आगामी विधानसभा निवडणुकीत सोलापूरमध्ये आपले वर्चस्व प्रस्थापित करण्याच्या दिशेने घेतलेले ठोस पाऊल आहे.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community