-
विशेष प्रतिनिधी, मुंबई
सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार चार आठवड्यांच्या काळात निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर करणे आवश्यक असतानाही अद्यापही हा कार्यक्रम कालावधी संपुष्टात येत असताना याची घोषणा केली जात नाही. त्यामुळे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूक कार्यक्रमाकडे सर्वांचे इच्छुक उमेदवारांचे लक्ष असून २२७ मतदारसंघांची प्रभाग रचना आणि त्यावरील आरक्षण जाहीर करण्याचा कार्यक्रम जाहीर होण्याची सर्वांची प्रतीक्षा आहे. त्यामुळे हे आरक्षण जाहीर झाल्यास मोठ्याप्रमाणात शिवसेना उबाठा (Shiv Sena UBT) आणि मनसेमधील बहुसंख्य माजी नगरसेवक आणि पदाधिकारी हे शिवसेना आणि भाजपात प्रवेश करण्याच्या उंबरठ्यावर असल्याचे बोलले जात आहे.
(हेही वाचा – देशाने भगवान श्रीकृष्ण आणि Veer Savarkar यांच्या विचारांवर चालणे गरजेचे; मंजिरी मराठे यांचे आवाहन)
मुंबई महापालिकेतील सन २०१७ मध्ये निवडून आलेल्या ४८ हून अधिक माजी नगरसेवकांनी शिवसेनेत प्रवेश केलेला आहे. तर सन २०१२ आणि सन २००७ मध्ये निवडून आलेल्या माजी नगरसेवकांनी शिवसेनेत प्रवेश केलेला आहे. त्यामुळे शंभर हून अधिक माजी नगरसेवकांनी शिवसेनेत प्रवेश केलेला असून सन २०१७ मध्ये निवडून आलेल्या नगरसेवकांपैंकी उबाठाकडे अजुनही ५५ माजी नगरसेवक आहेत. या सर्व शिवसेना उबाठाकडे (Shiv Sena UBT) असलेल्या माजी नगरसेवकांनी आरक्षणाची प्रतीक्षा आहे. हे आरक्षण जाहीर झाल्यानंतर शिवसेना उबाठातील अनेक माजी नगरसेवक आणि पदाधिकारी शिवसेनेत उड्या मारणार असून यासर्वांनी सध्या वेट अँड वॉचची भूमिका घेतली आहे. पश्चिम उपनगरांतील ५ माजी नगरसेवक, पूर्व उपनगरांतील ६ आणि शहरांतील ५ अशाप्रकारे सुमारे १६ माजी नगरसेवक हे शिवसेना आणि भाजपाच्या संपर्कात असून आरक्षण जाहीर झाल्यानंतर ही सर्व उड्या मारतील असे बोलले जात आहे.
(हेही वाचा – Covid चा आजार वाढल्यास उपनगरीय रुग्णालयातील ऑक्सिजन प्लांट होणार कार्यान्वित)
पहिल्या टप्प्यात १६ नगरसेवकांची यादी असली तरी भविष्यात यापेक्षा काही माजी नगरसेवक जाऊ शकतात. परंतु शिवसेनेत यापूर्वी गेलेले माजी नगरसेवक आणि त्यांना आरक्षणानुसार प्रभागात संधी मिळणार नसेल तर शिवसेना उबाठातील (Shiv Sena UBT) काही नगरसेवक हे शिवसेना आणि भाजपात आरक्षणाच्या उपलब्धेतनुसार प्रवेश करू शकतील असे बोलले जात आहे. विशेष म्हणजे शिवसेना पक्ष हा भाजपासोबत युतीमध्ये लढतो की स्वतंत्र लढतो याकडे सर्वांचे लक्ष आहे. त्यामुळे आरक्षण जाहीर झाल्यानंतर माजी नगरसेवक आणि पदाधिकाऱ्यांचा प्रवेशाचे बार फोडले जातील अशीही शक्यता वर्तवली जात आहे.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community