कळवा-खारेगावातील माजी नगरसेवकांचा Shiv Sena प्रवेश; जितेंद्र आव्हाड यांना मोठा धक्का

71
कळवा-खारेगावातील माजी नगरसेवकांचा Shiv Sena प्रवेश; जितेंद्र आव्हाड यांना मोठा धक्का
  • प्रतिनिधी

कल्याण-डोंबिवली लोकसभा क्षेत्रातील कळवा, खारेगाव, विटावा परिसरात राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) पक्षाचे सहा माजी नगरसेवकांनी शिवसेनेत (Shiv Sena) प्रवेश केला आहे. उपमुख्यमंत्री आणि शिवसेना प्रमुख एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत हा पक्षप्रवेश सोहळा पार पडला.

(हेही वाचा – आश्रमशाळांच्या समस्या प्राधान्याने सोडवणार; मंत्री Atul Save यांचा निर्धार)

पक्षप्रवेश केलेल्यांमध्ये ठाणे महापालिकेचे माजी विरोधी पक्षनेते मिलिंद पाटील, माजी नगरसेविका मनाली पाटील, महेश साळवी, मनिषा साळवी, ठाणे महिला राष्ट्रवादीच्या कार्याध्यक्ष व माजी नगरसेविका सुरेखा पाटील आणि माजी नगरसेवक सचिन म्हात्रे यांचा समावेश आहे. या सर्वांनी भगवा झेंडा स्वीकारून शिवसेनेत (Shiv Sena) प्रवेश केल्याने कळवा-मुंब्रा विधानसभेतील राजकीय समीकरणांमध्ये मोठा बदल होण्याची शक्यता आहे.

(हेही वाचा – IPL 2025, MI vs PBKS : ऑपरेशन सिंदूरचा असाही परिणाम; मुंबई विरुद्ध पंजाब सामना धरमशालातून हलवण्याची शक्यता)

हा पक्षप्रवेश म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि स्थानिक आमदार जितेंद्र आव्हाड यांच्यासाठी मोठा धक्का मानला जात आहे. सुप्रीम कोर्टाने स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आगामी चार महिन्यांत घेण्याचे निर्देश दिल्यानंतर, राजकीय हालचालींना वेग आला असून पक्षांतराचे प्रमाण वाढले आहे. या घडामोडींमुळे शिवसेना (Shiv Sena) ठाणे विभागात आपली पकड अधिक बळकट करत असल्याचे स्पष्ट झाले आहे. महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर ही घडामोड राजकीयदृष्ट्या महत्त्वपूर्ण ठरू शकते.

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.