जम्मू काश्मीर येथील पहलगाम येथे झालेल्या भ्याड दहशतवादी हल्ल्याला भारतीय लष्कराने जोरदार प्रत्युत्तर दिले आहे. मंगळवारी रात्रीच्या सुमारास भारतीय हवाई दलाने पाकिस्तान आणि पीओकेमध्ये हवाई हल्ले केले. जवळपास 7 शहरांमधील 9 दहशतवादी अड्ड्यांवर हल्ला करण्यात आला आहे. यानंतर भारतीय नागरिकांनी एकच जल्लोष सुरू केला आहे. त्यात निवृत्त लष्कर प्रमुख मनोज नरावणे यांनी सूचक विधान केलं आहे. (Operation Sindoor)
Abhi picture baki hai…
— Manoj Naravane (@ManojNaravane) May 7, 2025
पाकिस्तानच्या इंटर-सर्व्हिसेस पब्लिक रिलेशन्स (ISPR) चे संचालक लेफ्टनंट जनरल अहमद शरीफ चौधरी यांनी सांगितले की, भारताने २४ क्षेपणास्त्रे डागली आहेत. वृत्तसंस्था ANI ने सूत्रांच्या हवाल्याने सांगितले की, पंतप्रधान मोदी रात्रभर ऑपरेशन सिंदूरवर लक्ष ठेवत होते. वृत्तसंस्था एएनआयने सूत्रांच्या हवाल्याने सांगितले की, भारतीय लष्कराने पहलगाम दहशतवादी हल्ल्यासाठी जैश-ए-मोहम्मद आणि लष्करच्या अड्ड्यांवर हल्ला करण्याच्या उद्देशाने लक्ष्य निवडले होते. (Operation Sindoor)
हेही वाचा-Operation Sindoor : पाकला भारतीय सेनेचा आणखी एक दणका ! सीमेवर पाडले JF-17
पहलगाम दहशतवादी हल्ल्याला प्रत्युत्तर देताना, भारतीय सैन्याने पाकिस्तान आणि पीओकेमधील लष्कर-ए-तैयबा, जैश-ए-मोहम्मद आणि हिजबुल मुजाहिदीन या दहशतवादी संघटनांचे तळ क्षेपणास्त्र हल्ल्यांद्वारे उद्ध्वस्त केले. या नंतर निवृत्त लष्कर प्रमुख मनोज नरावणे यांनी सूचक ट्विट केले आहे. त्यांनी एक्स या समाज माध्यमावर “अभी पिक्चर बाकी है”, असे सूचक ट्विट केले आहे. (Operation Sindoor)
हेही पहा-
Join Our WhatsApp Community